Sections

लग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 24 एप्रिल 2018
Marriage

पुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल... कर्जबाजारी झाल्यामुळे गरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आत्महत्या... हे सर्व दुष्टचक्र थांबविण्यासाठी धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी मोफत लग्नसोहळ्यांचे आयोजन केले आहे. 

पुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल... कर्जबाजारी झाल्यामुळे गरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आत्महत्या... हे सर्व दुष्टचक्र थांबविण्यासाठी धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी मोफत लग्नसोहळ्यांचे आयोजन केले आहे. 

राज्याचे धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी धर्मादाय संस्थांना सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला पुण्यासह राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात सामुदायिक सोहळ्यात १८ जोडप्यांचा आणि भीमाशंकर येथे ११ जोडप्यांचा विवाह नुकताच पार पडला. 

पुणे जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह समिती आणि संस्थांच्या वतीने एप्रिल आणि मे महिन्यात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गरीब, श्रीमंत आणि कोणत्याही जाती-धर्माच्या वधूवरांना सहभागी होता येईल. लग्नासाठी एकही रुपयाचा खर्च येणार नाही. काही संस्थांकडून सोहळ्यात वधूवरांना पूर्ण पोशाख, शालू, मणीमंगळसूत्र अशा सुविधा देण्यात येणार आहेत. या सोहळ्यात गरीब, श्रीमंत तसेच शेतकरी, कष्टकऱ्यांनी मुला-मुलींचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात करावीत, असे आवाहन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्‍त शिवाजीराव कचरे आणि धर्मादाय उपायुक्‍त नवनाथ जगताप यांनी केले आहे. 

संस्थापिका होणार विवाहबद्ध दौंड येथील आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका शुभांगी धायगुडे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात त्या स्वतः आणि अन्य २१ जोडपी विवाहबद्ध होत आहेत. शुभांगी यांचे वडील नवनाथ धायगुडे हे सहायक फौजदार आहेत. धर्मादाय आयुक्‍त डिगे यांच्या विचारांच्या प्रेरणेतून सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे नियोजित वधू शुभांगी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सामुदायिक विवाह सोहळा, आयोजक संस्था आणि तारीख  आई सेवाभावी संस्था, दौंड : २७ एप्रिल २०१८  श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान, निमगाव सावा,  ता. मावळ : २८ एप्रिल २०१८  ग्राम विकास मंडळ, खोडद : २९ एप्रिल २०१८   म्हसोबा देवस्थान, खारवडे, मुळशी : २९ एप्रिल २०१८  श्री भैरवनाथ आदिवासी मंडळ : ६ मे २०१८  आदर्श क्रांती संघ, सासवड : ७ मे २०१८  रांजणगाव गणपती : ९ मे २०१८  मार्तंड देव संस्थान, जेजुरी : १० मे २०१८  विघ्नहर देवस्थान, ओझर : ११ मे २०१८

सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करणे हे कमीपणाचे नसून, प्रतिष्ठेची बाब आहे. सामाजिक बांधिलकी आणि सलोखा जोपासण्यासोबतच अनावश्‍यक खर्च होऊ नये, हा यामागील उद्देश आहे. धार्मिक संस्थांकडे पडून असलेला निधी हा सार्वजनिक पैसा आहे. त्यापैकी काही निधीचा वापर हा शेतकरी आणि गरीब घटकांसाठी झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  - शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्‍त.

Web Title: Community marriage event expenditure organisation

टॅग्स

संबंधित बातम्या

Vehicle
बेवारस वाहनांना ‘ब्रेक’

औरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वर्षानुवर्षे धूळखात पडून असलेल्या भंगार वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. अनेक वेळा शेजारी राहणाऱ्यांना मनस्ताप...

railway
दादर-रत्नागिरी पॅसेंजर प्रवाशांनी रोखली

रत्नागिरी : गणेशोत्सव आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांनी कोकण रेल्वेला दणका दिला. दादर रत्नागिरी पॅसेंजर मध्ये जागा ना मिळाल्याने संतापलेल्या...

जालना - गणपती नेत्रालयात सोमवारी झालेल्या कार्याक्रमात बोलताना राज्यपाल सी. विद्यासागरराव. व्यासपीठावर मान्यवर.
कौशल्य विकास केंद्राची प्रकिया सुरू - सी. विद्यासागर राव

जालना - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जालन्यात कौशल्य विकास केंद्र (स्किल डेव्हलपमेंट सेंटर) सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून...

कर्नाटकात इंधन दोन रुपयांनी स्वस्त

बंगळूर - इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील भार कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी निर्णय घेतला आहे...

chalo jeete hai
अकाेला : जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘चलाे जीते है’ लघुचित्रपटाचे प्रक्षेपण

अकाेला : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे जीवन विद्यार्थ्यांसमाेर उलगडावे या उद्देशाने मंगळवारी (ता. 18) जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ‘...