Sections

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार संरक्षणशास्त्राचे धडे 

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 11 एप्रिल 2018
Class X students will get protection lessons

पुणे  - जम्मू-काश्‍मीरमधील सीमारेषेपलीकडील दहशतवाद, अतिरेकी कारवाया, नक्षलवाद याबरोबरच सर्वसमावेशक सुरक्षा, अवकाश आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, याचा अभ्यास दहावीतील विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचे बदलते स्वरूप आणि त्याअंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य या विषयाची माहिती विद्यार्थी ‘संरक्षणशास्त्र’ या विषयातून घेणार आहेत.

पुणे  - जम्मू-काश्‍मीरमधील सीमारेषेपलीकडील दहशतवाद, अतिरेकी कारवाया, नक्षलवाद याबरोबरच सर्वसमावेशक सुरक्षा, अवकाश आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, याचा अभ्यास दहावीतील विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचे बदलते स्वरूप आणि त्याअंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य या विषयाची माहिती विद्यार्थी ‘संरक्षणशास्त्र’ या विषयातून घेणार आहेत.

दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात ‘संरक्षणशास्त्र’ या विषयाच्या कार्यपुस्तिकेतून विद्यार्थ्यांना संरक्षणशास्त्राचे धडे मिळणार आहेत. गेल्यावर्षी इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात ‘संरक्षणशास्त्र’ या विषयाची कार्यपुस्तिका नव्याने समाविष्ट करण्यात आली. त्यात राष्ट्रीय सुरक्षा (बाह्य) आव्हाने, भारतीय संरक्षण व्यवस्थेची रचना, सेनादलातील विविध पदांची क्रमवारी, भारतीय सैन्य दल, पोलिस दल अशी संरक्षण व्यवस्थेची मूलभूत माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या पाठ्यपुस्तकात त्या पुढील टप्प्यातील माहितीचा समावेश केला आहे. एकविसाव्या शतकात आवश्‍यक असलेली संरक्षणशास्त्रविषयक माहिती आत्मसात करण्यासाठी आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधी, याबाबत विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वसमावेशक सुरक्षा, मानवी सुरक्षा याबरोबरच देशात आजवर झालेले दहशतवादी हल्ले, नक्षलग्रस्त प्रदेश दाखविणारा ‘रेड कॉरिडॉर’ हे विद्यार्थी अभ्यासणार आहेत. देशातील सामाजिक आणि राजकीय समस्या जाणून घेण्यासाठी राजकीय नेते, सरकारी अधिकारी यांच्या भेटी विद्यार्थ्यांनी घ्याव्यात, अशा सूचनाही यात आहेत.

‘संरक्षणशास्त्र’ विषयातील वैशिष्ट्ये :-  - अतिरेकी कारवाया, नक्षलवाद, दहशतवाद याची ओळख - अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/११च्या दहशतवादी हल्ल्यापासून ते २०१७ मध्ये लंडन ब्रीज येथे झालेल्या हल्ल्याचा उल्लेख - देशातील संसदेवरील हल्ला (डिसेंबर २००१), मुंबईतील २६/११चा मुंबईतील हल्ला, - ‘आपत्ती व्यवस्थापना’त पुणे जिल्ह्यात २०१४ मध्ये माळीण येथे झालेले भूस्खलन - त्सुनामी, चक्रीवादळे, अतिवृष्टी, ढगफुटी  - राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) ओळख - क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील : पृथ्वी, त्रिशूळ, अग्नी, ब्राह्मोस, पीएसएलव्ही - ‘परम ८००’ हा सी-डॅकने विकसित केलेला पहिला महासंगणक; ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे योगदान

करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) यांसह नौसेना, वायू सेना दल अशा विविध संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देण्यात आली आहे. तसेच त्यासंदर्भातील अधिकृत संकेतस्थळांची लिंकदेखील शेअर केली आहे.

विषयाचे मूल्यमापन : - स्वतंत्र लेखी स्वरूपात परीक्षा नसेल - कार्यपुस्तिकेत दिलेल्या लेखी कामासाठी ४० टक्के  - चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखत, भूमिका यासाठी ६० टक्के - यानुसार गुणांचे श्रेणीत रूपांतर करून विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येईल.

Web Title: Class X students will get protection lessons

टॅग्स

संबंधित बातम्या

टिमकी, ताशांचा जोर

नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-...

Born minutes after launch, baby girl in Jharkhand becomes first beneficiary of Ayushman Bharat scheme
झारखंडमधील चिमुकली "आयुषमान'ची पहिली लाभार्थी

जमशेदपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) उद्‌घाटन रविवारी (ता. 23) झारखंडमध्ये...

पुण्यात डीजेप्रकरणी ९८ मंडळांवर गुन्हे

पुणे - उच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातल्यानंतरही शहरातील अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘डीजे’चा दणदणाट सुरू ठेवला. मात्र, पोलिसांनी ठोस भूमिका...

Abdulla Yameen concedes defeat in Maldives presidential election
मालदिवचे विद्यमान अध्यक्ष पराभूत

कोलंबो- मालदिवमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना पराभूत करत विरोधीपक्षांचे उमेदवार इब्राहिम महंमद...

विसर्जनासाठी ‘यिन’चे हात सरसावले

पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या...