Sections

बोरी-अकोले रस्त्याचे व पुलाचे काम निकृष्ठ

राजकुमार थोरात  |   सोमवार, 2 एप्रिल 2018
road

वालचंदनगर (पुणे) : बोरी (ता.इंदापूर) येथे पुलाचे व बोरी-अकोले व रस्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून काम चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन बोरी-अकोले रस्त्यासाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासुन रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र ठेकेदार रस्त्यासाठी निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापर असल्याने डांबरीकरण उखडू लागले आहे. तसेच बोरी गावाजवळील ओढ्यावरती पुल बांधण्याचे काम सुरु असून पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून मातीमिश्रित वाळू वापरली जात असून कमी सिमेंट वापरले जात आहे.

पुलाच्या बांधकामावर गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणी न मारल्यामुळे बांधकाम ठिसूळ झाले आहे. ग्रामस्थांनी याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली अाहेत. ग्रामस्थांनी पुलावरती जाऊन कामाची पाहणी केली. रस्त्याचे व पुलाचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यास काम बंद  ठेवण्याचा इशारा बोरी ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघाचे सदस्य भारत शिंदे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रामभाऊ जोरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पाटील, आझाद मुलाणी, हरिदास देवडे, दयानंद चव्हाण, दत्तात्रय शिंदे, सचिव कुचेकर, बापु धायगुडे, राजू ठोंबरे उपस्थित होते.

Web Title: bori akole road work inferior quality

टॅग्स

संबंधित बातम्या

kancha ilaiah
देशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया

लातूर : "शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...

mangalwedha
हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी सुरु

मंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन...

pata-varvanta.
मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून

पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...

Shivajirao-Adhalrao-Patil
विधानसभेच्या चर्चांना अर्थ नाही - आढळराव

राजगुरुनगर - ‘खेडचे आमदार सुरेश गोरे आणि माझा चांगला संवाद आहे. आम्ही एकविचाराने काम करीत आहोत. त्यामुळे माझा कोणालाही छुपा पाठिंबा वगैरे असण्याचा...

manmad
माधवरव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

मनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या  पार्थिवावर मनमाडच्या...

dr.jagdish-hiremth
ताणतणाव नियंत्रणात मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची

दौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात...