Sections

भाजपला गुर्मी नडली

ज्ञानेश सावंत |   रविवार, 8 एप्रिल 2018
हडपसर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांच्या विजयाची घोषणा होताच, चेतन तुपे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद असली, तरी पूजा यांना चंचला कोद्रे यांच्या इतकी मते मिळणार नसल्याची चर्चा होती. याचा फायदा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह आमदार टिळेकर, जगदीश मुळीक हे प्रचारात उतरले होते. मात्र त्याचा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीकडून शहराध्यक्षा वंदना चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक बंडू गायकवाड यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, नाना भानगिरे, प्राची आल्हाट यांनी जोरदार प्रचार केला.

पुणे - राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती आणि वातावरणाचे पडसाद मुंढव्यातील पोटनिवडणुकीत उमटले. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली; मात्र यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाला सणसणीत चपराक बसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. भाजप नेत्यांचा अविर्भाव, गटातटाचे राजकारण आणि ढिसाळ प्रचार यंत्रणेमुळेच या पक्षाला धक्का नव्हे, तर हादरा बसला आहे. या निकालामुळे भाजपविरोधातील असंतोषही दिसून आला. दुसरीकडे, शिवसेनेने मुसंडी मारत, पाच हजारांहून अधिक मते मिळविली. परिणामी, या निवडणुकीने हडपसरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या निवडणुकीत त्यांच्या जाऊ व राष्ट्रवादीच्या उमेदवार पूजा कोद्रे विजयी झाल्या.

शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर सुकन्या गायकवाड यांच्या पारड्यात ४ हजार ३३४ मते पडली. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत गायकवाड यांना ११ हजार ४०० मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या विजयापेक्षा भाजपची मते घटल्याने आगामी निवडणुकांमध्ये या पक्षासाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे. मुंढव्याच्या निकालामुळे आमदार योगेश टिळेकर यांच्यासाठी धक्कादायक असल्याची चर्चा आहे.भाजपला दुसरा क्रमांक टिकविता आला नाही. तसेच भाजप आणि शिवसेनेची मते एकत्र केल्यास तो आकडा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे. हा आकडा राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठीही इशारा असल्याची चर्चा आहे. येत्या काळात भाजप-शिवसेनेची युती झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही काँग्रेसवर होईल, ही शक्‍यताही नाकारता येत नाही.

भाजपमध्ये गटतट मुंढवा-मगरपट्‌टासिटीमधील वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली होती. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धूळ चारून ही जागा ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती होती. परिणामी, या निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता होती. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच होती. गायकवाड यांना गेल्या वेळी संधी दिल्याने अन्य इच्छुकांनी यंदा उमेदवारीची मागणी केली होती. त्यावरून भाजपमध्ये गटतट दिसून आले.  

Web Title: bjp ncp municipal by election politics

टॅग्स

संबंधित बातम्या

kalas
इंदापुरात पाणी आणण्यासाठी असावी लागते मनगटात ताकद

कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको...

इंधन दर वाढीविरोधात पंचायत समिती सदस्य वापरतोय सायकल

दिघंची - सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने देशातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनतेची आर्थिक घडी विस्कटली आहे. पेट्रोल वाहनाला...

Congress Trying to establish power in Goa
गोव्यात काँग्रेसचा 'हात' सत्तेसाठी सरसावला

पणजी : काँग्रेसच्या गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे प्रभारी डॉ. ‌ए. चेल्लाकुमार गोव्यात पोहोचले आहेत. काँग्रेसने सरकार...

wagholi
सातव विद्यालयाचा संस्था वर्धापनदिन उत्साहात साजरा

वाघोली : वि.शे.सातव विद्यालयाचा संस्था वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयास देणगी देणाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा...

Raj Thackrey Creates Cartoon And Criticise Modi And Amit Shah again
'मोदी, शहा संघाच्या वर्गा बाहेरचे विद्यार्थी'

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानातील...