Sections

इंद्रायणी नदीला जैव कचर्‍याचे ग्रहण!

गणेश बोरुडे |   बुधवार, 25 एप्रिल 2018

तळेगाव : मावळसह देहू-आळंदीतील वारकर्‍यांची लोकमाता मानल्या जाणार्‍या इंद्रायणी नदीला जैविक कचर्‍याचे ग्रहण लागले आहे. मावळातील आंबी पुलाजवळ इंद्रायणीच्या मुख्य प्रवाहात धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याने पंचक्रोशीत रोगराईची भीती आहे.

तळेगाव : मावळसह देहू-आळंदीतील वारकर्‍यांची लोकमाता मानल्या जाणार्‍या इंद्रायणी नदीला जैविक कचर्‍याचे ग्रहण लागले आहे. मावळातील आंबी पुलाजवळ इंद्रायणीच्या मुख्य प्रवाहात धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याने पंचक्रोशीत रोगराईची भीती आहे.

आंबी-वराळे रस्त्यावरील पुलाशेजारी इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या मुख्य प्रवाहात अॅंटीबायोटिक, जुलाबाच्या गोळ्या, पेन किलर, मळमळ-उलटीच्या गोळ्या, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांच्या शेकडो स्ट्रिप्स, तसेच भुलीच्या इंजेक्शनच्या बाटल्या, सुया, मलम, इतर मुदतबाह्य औषधे आणि खोक्यात भरलेला धोकादायक जैव वैद्यकीय कचरा जलपर्णीत अडकला होता. आंबी ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी गोविंद शितकल यांच्या सोमवारी ही बाब लक्षात आली. त्यांनी हा कचरा तातडीने बाजूला करून उपसरपंच जितेंद्र घोजगे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

झाल्या प्रकारामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर अवलंबून गावांतील रहिवाशी आणि पशुधनाच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून,रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे.जीवसृष्टीला धोकादायक जैविक कचर्याच्या विल्हेवाटीबाबत शहरी भागात कडक नियम असले तरी, ग्रामीण भागात मात्र यंत्रणा नसल्याने हा कचरा उघड्यावरच फेकला जातो.

कायद्यान्वये रुग्णालयांना नोंदणी करतानाच जैविक कचरा विल्हेवाटीबाबत उपाययोजना बंधनकारक आहे. जैव कचरा जास्तीत जास्त ४८ तासाच्या आत गोळा करून आधुनिक यंत्रणेच्या सहायाने त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे सक्तीचे आहे.

तळेगाव जनरल हाॅस्पीटल आवारातील लाईफ सिक्युर केंद्रात जैैैैव कचरा शुल्क आकारणी करुन खास वाहनाद्वारे संकलित करुन, त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.मात्र जागरुकतेअभावी अद्यापही ग्रामीण भागातील काही वैद्यकिय व्यावसायिक विल्हेवाटीचा किरकोळ पैसा वाचवण्यासाठी धोकादायक जैविक कचरा उघड्यावर अथवा नदी,नाल्यांत फेकत असल्याने तो मानवासह पशुधनाला धोकादायक ठरण्याची भीती आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंदर्भात कठोर कारवाईचे अधिकार असले,तरी त्यांनी मावळ तालुका वार्यावर  सोडल्यासारखी परिस्थिती आहे.यावर वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास नदीकाठच्या गावांसह पाणीपुरवठा होणा-या लोकवस्तीला संसर्गजन्य आजारांना तोंड द्यावे लागणार आहे.

"परिसरातील जवळपास सर्वच वैद्यकिय व्यावसायिक सरकारमान्य जैविक कचरा विल्हेवाट केंद्राचे सदस्य असून,एकादिवसाआड संंकलीत करुन वर्गीकरणानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते." - सुहास मेडसिंगे, संचालक, लाईफ सिक्युर एटरप्रायजेस

"प्रदुषण नियंत्रण मंडळाने सदर जैविक कचर्याची तपासणी करुन,तो नदीत फेकणार्या दोषी वैद्यकिय व्यावसायिकांवर कारवाई करावी." - जितेंद्र घोजगे, उपसरपंच, आंबी

Web Title: Bio medical wastes in Indrayani River

टॅग्स

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...

छोट्यांचे मोठे यश

छोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...

टंचाई आराखड्यातील कामे सुरू करा

पुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...

अभिजित बांगर
अभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त

अभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...

pmp-twitter.jpg
पीएमपीने ट्‌विटर सुरु करावे 

पुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...

parner.jpg
पारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे

पारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...