Sections

भगवान बुद्धांचे उलगडणार अंतरंग

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 21 एप्रिल 2018
Bhagwan Buddha

पुणे - भौतिक सुखसाधनांची रेलचेल असूनही शांतता नसण्याच्या आजच्या काळाला सामोरे जाण्यासाठी सरश्रींसारखे आध्यात्मिक गुरू समाजाला मार्गदर्शन करत असतात. भारतीय आध्यात्मिक परंपरेची आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून आजच्या काळाच्या भाषेत पुनर्मांडणी करणे हे सरश्रींचे बलस्थान आहे. त्यांची विचारप्रवर्तक प्रवचने आणि पुस्तके असंख्य लोकांच्या जीवनाला दिशा देणारी ठरली आहेत.

पुणे - भौतिक सुखसाधनांची रेलचेल असूनही शांतता नसण्याच्या आजच्या काळाला सामोरे जाण्यासाठी सरश्रींसारखे आध्यात्मिक गुरू समाजाला मार्गदर्शन करत असतात. भारतीय आध्यात्मिक परंपरेची आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून आजच्या काळाच्या भाषेत पुनर्मांडणी करणे हे सरश्रींचे बलस्थान आहे. त्यांची विचारप्रवर्तक प्रवचने आणि पुस्तके असंख्य लोकांच्या जीवनाला दिशा देणारी ठरली आहेत.

येत्या रविवारी (ता. २२) सरश्रींचे भगवान बुद्धांचे विचार समजावून सांगणारे ‘बोझ नहीं, बोध के फॅन बनो ः अज्ञात की रुहानी हवा’ हे प्रवचन होत आहे. तेजज्ञान फाउंडेशनच्या सणसनगर, नांदोशी गाव, किरकटवाडी फाटा येथील मनन आश्रमात दुपारी १ ते ४ दरम्यान हे प्रवचन होणार आहे. 

याच कार्यक्रमात ‘सकाळ प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भगवान बुद्ध जीवनचरित्र आणि निर्वाण अवस्था’ या सरश्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. राजकुमार सिद्धार्थ साधक गौतम कसे झाले, गौतमाला बोधप्राप्ती होऊन ते भगवान बुद्ध कसे झाले आणि बोधप्राप्तीनंतर त्यांनी काय केले, तसेच बौद्ध मूलतत्त्वे कोणती आणि आजही ती प्रस्तुत कशी आहेत, याची मांडणी सरश्री यांनी या पुस्तकात केली आहे. 

‘सकाळ प्रकाशन’ने या आधी सरश्री यांची ‘अंतर्मनाच्या शक्तीपलीकडील आत्मबळ’, ‘रामायण - वनवास रहस्य’, ‘संत ज्ञानेश्‍वर - समाधी रहस्य आणि जीवनचरित्र’, ‘स्वामी विवेकानंद - भारतातील गुरू - शिष्य परंपरेची मशाल’, ‘सदगुरू नानक - साधना रहस्य आणि जीवनचरित्र’, ‘भगवान महावीर - मनावर विजय प्राप्त करण्याचा मार्ग’ आणि ‘तुकाराम महाराज - अभंग रहस्य आणि जीवनचरित्र’ आदी पुस्तके प्रकाशित केली आहेत.

आपल्या आध्यात्मिक परंपरेची मदत घेऊन आजच्या काळाच्या आव्हानांना सामोरे कसे जाता येईल, हे दाखवणाऱ्या या मार्गदर्शनपर पुस्तकांना वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

पुस्तके राज्यभर उपलब्ध सकाळ प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके सकाळ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये व महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेते यांच्याकडे उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीसाठी कृपया www.sakalpublications.com किंवा amazon.in वर लॉग-इन करावे.  अधिक माहितीसाठी संपर्क - ८८८८८४९०५९ (कार्यालयीन वेळेत).

Web Title: bhagwan gautam buddha Biography book publish

टॅग्स

संबंधित बातम्या

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...

muktapeeth
चिरंतन छत्र

वडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...

pune-herritage-walk.jpg
"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद

पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...

flex.jpg
धोकादायक फ्लेक्‍स हटवा

पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...

mesb.jpg
केबलसाठी केलेले खड्डे बुजवा 

पुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...

शाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...