Sections

खासगी बसचालकांवर कारवाईसाठी टाळाटाळ 

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 9 मे 2018
suryakant-pathak

पुणे - खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांच्या मनमानीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. मात्र, त्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच बसचालकांविरुद्ध कारवाई होत नाही, असा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केला आहे. 

पुणे - खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांच्या मनमानीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. मात्र, त्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच बसचालकांविरुद्ध कारवाई होत नाही, असा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केला आहे. 

उन्हाळी सुट्या सुरू झाल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याचा फायदा घेऊन एसटी स्थानकांत जाऊन प्रवाशांना आकर्षित करणाऱ्या खासगी बसच्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. सुटीच्या काळात एसटीसह रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे खासगी बस चालकांनी तिकीटदरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. त्याकडे प्रशासन आणि आरटीओ दुर्लक्ष करीत आहे. पाठक म्हणाले, ""आरटीओच्या नियमानुसार खासगी बस वाहतूकदारांना प्रासंगिक करारावर प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. नियमाप्रमाणे प्रवाशांची यादी आरटीओकडून मंजूर करून घेणे आवश्‍यक आहे. परंतु, या नियमाकडे खासगी बसचालक दुर्लक्ष करीत आहेत. पुण्यातील अनेक बसस्थानकांबाहेर खासगी बसचालकांचे बुकिंग काउंटर आहेत. तर, अनेक ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीरपणे या बसेसचे पार्किंग केले जाते. खासगी बससेवेवर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नसल्याची शक्‍यता आहे. तसेच पोलिस आणि आरटीओ प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.'' 

Web Title: Avoiding private bus drivers for action

टॅग्स

संबंधित बातम्या

एसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम
एसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम (व्हिडिओ)

कऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम   कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण...

एसटी देणार पॉकेटमनी! 

कऱ्हाड - एसटीच्या कामागारांच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन मुलांसाठी पॉकेटमनी म्हणून दरमहा 750 रुपये देण्यात येतील. मुलांना शिक्षणासाठी महामंडळ...

karhad
कऱ्हाडमध्ये एसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम 

कऱ्हाड - एसटीमध्ये वडील चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देणं लागतो या उद्दात हेतुने कऱ्हाडचे (जि.सातारा) आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉक्टर...

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 जणांवर कडक कारवाई  

कल्याण - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षभरात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 वाहन...

एसटी उभारणार अद्ययावत मार्गस्थ निवारे 

मुंबई - राज्यातील एसटीच्या मार्गस्थ निवाऱ्यांची पडझड झाली असल्याने महामंडळ आता 3500 अद्ययावत निवारे बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे...

विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास होणार जप्तीची कारवाई

मुंबई: मद्य पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज...