Sections

औंध, बाणेर, बालेवाडीचा बदलणार चेहरा

मंगेश कोळपकर |   सोमवार, 23 एप्रिल 2018
Smart-City

पुणे - स्मार्ट सिटीअंतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडीत २७ किलोमीटरचे ‘स्मार्ट स्ट्रीट’, तसेच मोकळ्या जागांचा वापर नागरिकांच्या उपक्रमासाठी व्हावा, यासाठी प्लेसमेकिंगच्या चार प्रकल्पांचे काम १५ मे पासून सुरू होणार आहे. तसेच, ट्रान्स्पोर्ट हब आणि ई-कनेक्‍टिव्हिटीमुळे येत्या वर्षात औंध, बाणेर आणि बालेवाडीचा चेहरा-मोहरा बदलला जाणार आहे.  

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ३२५ कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून, १५ मे दरम्यान या कामांचा प्रारंभ होणार आहे. ‘स्मार्ट स्ट्रीट’ उपक्रमातंर्गत औंधमधील दीड किलोमीटर स्मार्ट रस्ता साकारला आहे.

पुणे - स्मार्ट सिटीअंतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडीत २७ किलोमीटरचे ‘स्मार्ट स्ट्रीट’, तसेच मोकळ्या जागांचा वापर नागरिकांच्या उपक्रमासाठी व्हावा, यासाठी प्लेसमेकिंगच्या चार प्रकल्पांचे काम १५ मे पासून सुरू होणार आहे. तसेच, ट्रान्स्पोर्ट हब आणि ई-कनेक्‍टिव्हिटीमुळे येत्या वर्षात औंध, बाणेर आणि बालेवाडीचा चेहरा-मोहरा बदलला जाणार आहे.  

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ३२५ कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून, १५ मे दरम्यान या कामांचा प्रारंभ होणार आहे. ‘स्मार्ट स्ट्रीट’ उपक्रमातंर्गत औंधमधील दीड किलोमीटर स्मार्ट रस्ता साकारला आहे.

पादचारी आणि सायकलस्वारांना उपयुक्त असलेल्या स्मार्ट स्ट्रिटच्या धर्तीवर आता २७ किलोमीटरचे रस्ते साकारले जातील, अशी माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.

तर, बाणेरमध्ये ट्रान्स्पोर्ट हब आणि ई-कनेक्‍टिव्हिटीचेही प्रकल्प आता कार्यान्वित होत आहेत. तसेच ई-बस, ई-रिक्षा आणि बीआरटीवर भर देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. 

१५ मे पासून सुरू होणारी कामे - स्मार्ट स्ट्रिट - - १६.५ किलोमीटर - १९५ कोटी - बालेवाडी - १०.०२ किलोमीटर - ९५ कोटी - बाणेर  - ०.०८ किलोमीटर - १५.८९ कोटी - औंध  - प्लेसमेकिंग  - ४ प्रकल्प- २.७२ कोटी - बाणेर आणि बालेवाडी

ई-कनेक्‍टिव्हिटी - या उपक्रमांतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडीमध्ये ई-कनेक्‍टिव्हिटी निर्माण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सुमारे २०० स्मार्ट पोल उभारण्यात येतील. सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतुकीसाठी संगणकीकृत प्रणाली, बीआरटीसाठी माहिती तंत्रज्ञान प्रणालीचे जाळे या पोलच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या पोलमधून केबल्सही जाऊ शकतील. त्यामुळे रस्त्यांची पुन्हा पुन्हा खोदाई करावी लागणार नाही. मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या, महावितरण यांच्यासाठी या विशेष व्यवस्था असतील. तसेच, वाय-फायचे ३५ टॉवर औंध, बाणेर आणि बालेवाडीमध्ये उभारण्यात येणार आहेत. सुमारे ४२० कोटी रुपयांचा हा प्रकल्प बांधा- वापरा- हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला खर्च येणार नाही व कायमस्वरूपी उत्पन्नही मिळणार आहे. १५ मे च्या सुमारास याबाबतचा निर्णय होईल.  

१०० ई-बस, २४ किलोमीटरची बीआरटी  स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक लवकरच होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात किमान १०० इलेक्‍ट्रॉनिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. या भागात २६ किलोमीटरची बीआरटी कार्यान्वित होईल. त्यात ५४ बसस्थानके असतील आणि त्यांना जोडण्यासाठी १०० ई-रिक्षांची खरेदी करण्यात येईल. त्यांचे प्रवासी भाडे माफक असेल, त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडल्यावर ई-रिक्षाच्या माध्यमातून बीआरटीपर्यंत पोचून इच्छित स्थळी जातील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली. 

औंध, बाणेर, बालेवाडीचा विकास कसा असावा? आपल्या सूचना फेसबुक आणि ट्विटरवर मांडा  #smartpune हॅशटॅगवर ई- मेल करा webeditor @esakal.com वर

ट्रान्स्पोर्ट हब  बाणेरमध्ये ११ एकर जागेत ट्रान्स्पोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्यात पीएमपीआरडीएच्या मेट्रोसाठी स्थानक असेल. तसेच, एसटी आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससाठी स्थानक उभारण्यात येणार आहे. या हबमधून बीआरटीची सेवाही सुरू करण्याचे नियोजन आहे. सुमारे १२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, सुमारे दोन ते तीन वर्षांत पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित संस्थेची निवड करून १५ मे पासून काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 

Web Title: aundh baner balewadi smart city smart street

टॅग्स

संबंधित बातम्या

गोंगाटामुळे अभ्यास नाही तर...

पुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी...

रेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक

दौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा....

junnar
ओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन

ओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...

karhad
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती

कऱ्हाड : येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती राबविण्यासाठी शहरासह पाचवड येथे तीन टन निर्माल्य जमा केले. येथील...

dead_body
उस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुचा पहिला बळी

जेवळी : स्वाईन फ्लुमुळे जेवळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील एका महिलेचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 25) सकाळी आठ...