Sections

साहित्य संमेलनाध्यक्षपद सन्मानाने द्यावे 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता अध्यक्षपद सन्मानाने ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात यावे. यासाठी साहित्य परिषदेने आग्रही भूमिका घ्यावी, असा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. फलटण येथे ही बैठक झाली. बैठकीत परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी ठराव मांडला. 

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता अध्यक्षपद सन्मानाने ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात यावे. यासाठी साहित्य परिषदेने आग्रही भूमिका घ्यावी, असा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. फलटण येथे ही बैठक झाली. बैठकीत परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी ठराव मांडला. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची नव्या आर्थिक वर्षातील ही पहिली बैठक होती. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, ""साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याबाबतची आग्रही भूमिका साहित्य परिषद घेईल.'' 

वाङ्‌मयीन पुरस्कारासाठी सर्व जिल्ह्यांतून परीक्षक  साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन गुहागर (रत्नागिरी), युवा साहित्य नाट्य संमेलन अंमळनेर (जळगाव), समीक्षा संमेलन पंढरपूर येथे आणि शाखा मेळावा दामाजीनगरला (सोलापूर) घेण्यात येईल. पुढील वर्षीपासून शाखा मेळावा साधेपणाने घेण्यात येईल. त्यासाठीची रक्कम आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पाच मसाप शाखांना देण्यात येईल. साहित्य परिषदेतर्फे वाङ्‌मयीन पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार देण्याकरिता पुढील वर्षापासून मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्व जिल्ह्यांतील तज्ज्ञ व्यक्तींची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येईल.

Web Title: akhil bharatiya marathi sahitya parishad

टॅग्स

संबंधित बातम्या

cricket
भारताचा ऑस्ट्रेलियात इतिहास; पहिल्यांदाच जिंकला पहिला सामना

अॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार ...

विजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..!

मुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...

manmad
मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

मनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ...

धुळ्यात एमआयएमचा शिरकाव

धुळे- धुळे महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी या निवडणुकीमध्ये एमआयएम या पक्षाने खाते उघडले आहे. सध्यातरी...

3arrested_54.jpg
दारू पाजून लुटण्याचा डाव तरुणाने उधळला 

पिंपरी : तरुणास दारू पाजून त्यास लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला. याप्रकरणी मोटार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन बबन कांबळे (वय 32...

_agitation.jpg
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आंदोलनचा इशारा 

पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना...