Sections

प्लॅस्टिक ड्रमने रोखली जलपर्णी

विलास काटे |   गुरुवार, 12 एप्रिल 2018
आळंदी (ता. खेड) ः जलपर्णी रोखण्यासाठी सिद्धबेट बंधाऱ्यातील पाण्यात नगरपालिकेने दोरीच्या साहाय्याने आडवे बांधण्यात आलेले प्लॅस्टिकचे ड्रम.

इंद्रायणीतील जलपर्णी काढण्यासाठी पुण्यातील जी. ए. सुके यांना वार्षिक निविदा दिली आहे. पंचवीस रुपये प्रतिस्क्वेअर मीटरचा दर होता. यात दहा दिवस या लोकांनी काम केले. मात्र, सध्याच्या बॅरल लावून जलपर्णी रोखण्याच्या नगरपालिकेच्या प्रयोगाला अवघे अडीच लाख रुपये खर्च आला आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपर्यंत याचा फायदा होऊ शकतो.
- समीर भूमकर, मुख्याधिकारी, नगरपालिका आळंदी

आळंदी पालिका कर्मचाऱ्यांचा प्रयोग; पिंपरीच्या सांडपाण्यामुळे समस्या

आळंदी (पुणे): पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीपात्रात गेले काही महिने जलपर्णीची बेसुमार वाढ झाली आहे. पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यातून पाणी उपसणेही कठीण झाले होते. त्यावर नगरपालिकेने कमी खर्चाचा उपाय शोधला असून प्लॅस्टिकचे 135 ड्रम वायरच्या साहाय्याने एकमेकांना बांधून ते पाण्यात सोडले आहेत, त्यामुळे जलपर्णी आटोक्‍यात आणली आहे. त्यासाठी पालिकेला सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला आहे.

जलपर्णी रोखण्यासाठी इतरांनाही हा कमी खर्चाचा पथदर्शी प्रयोग आहे, असे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. अधिक माहिती देताना मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली-कुदळवाडी भागातून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचा परिणाम आळंदीतील इंद्रायणी नदीत गेले काही महिने जलपर्णीची बेसुमार वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धबेट बंधाऱ्यात जलपर्णी वाढल्याने या ठिकाणी पाण्याला हिरवा रंग आला होता. पाण्यातील ऑक्‍सिजन कमी झाल्याने मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले होते. शहरातील पाणीपुरवठ्यावरही जलपर्णीमुळे परिणाम होत होता.

नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रेय सोनटक्के आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून तीन दिवसांपासून नदीपात्रात वायरच्या साहाय्याने एकमेकांना बांधलेले प्लॅस्टिकचे ड्रम सोडले. त्यातून जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उचलण्याच्या ठिकाणची जलपर्णी पूर्णपणे रोखली आहे. तीन वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने जलपर्णी रोखली गेली होती. मुख्य बंधाऱ्यापासून सुमारे पाचशे मीटर लांबवर जलपर्णी रोखल्यामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढले.

दरम्यान, जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्‍वास येवले म्हणाले, ""पाण्यातील नत्रयुक्त पदार्थ वाढले की जलपर्णीची वाढ होते. जलपर्णी ही समस्या नसून पाण्यातील प्रदूषणाचा मापदंड म्हणून आपण त्याकडे पाहिले पाहिजे. आळंदी पालिकेने पाण्यामध्ये ड्रम आणि वायरच्या साह्याने जलपर्णी रोखण्याचा केलेला प्रयत्न चांगला आहे. मात्र, तो दीर्घकालीन नाही. दीर्घकालीन उपाय म्हणून पाण्यातून जलपर्णी पूर्णपणे बाहेर काढून टाकणे हाच आहे. जलपर्णी हानिकारक का आहे तर पाण्याचा प्रवाह यामुळे रोखला जातो. यामध्ये डासांची उत्पत्ती वाढते. याव्यतिरिक्त प्लॅस्टिक कचराही याठिकाणी अडकून राहतो. जलपर्णी हटविण्यासाठी अनेकजण त्यावर औषध फवारणीही करतात. मात्र प्रदूषण वाढले की जलपर्णीची वाढ जोमाने होते. जलपर्णी रोखण्यासाठी सार्वजनिक स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रयत्न अपुरे पडत आहे. यासाठी वैयक्तिक पातळीवर मैलायुक्त सांडपाणी कमी प्रमाणात बाहेर फेकले जाईल, असे प्रयत्न केले पाहिजे. आपली घाण दुसऱ्याकडे टाकणे योग्य नाही. स्थानिक पातळीवरील सार्वजनिक संस्थांनी एकत्र येऊन ओढे, नाले यासारख्या ठिकाणी आळूसारख्या वनस्पतीची लागवड केली पाहिजे. मात्र, दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सरकारने जलपर्णी हटविण्यासाठी आर्थिक तरतूद केली पाहिजे.

  • प्लॅस्टिकच्या 135 ड्रमचा वापर
  • सुमारे अडीच लाख रुपये खर्च
  • पाचशे मीटर अंतरातील जलपर्णीस आळा

असा झाला फायदा

  • पाण्यातील ऑक्‍सिजनच्या प्रमाणात वाढ
  • पाण्याची शुद्धता वाढली
  • नदीतील जीवजंतूच्या अस्तित्वाचा धोका टळला
  • पाण्यातील माशांना संजीवनी

कर्मचाऱ्यांची युक्ती ठरली श्रेष्ठ नगरपालिकेने जलपर्णी काढण्यासाठी वर्षभरासाठी काही लाख रुपयांची निविदा काढली होती. मात्र, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कल्पक युक्तीमुळे पैशांची बचत झाली आणि जलपर्णीला आळाही बसला आहे.

Web Title: aalandi indrayani river pollution

टॅग्स

संबंधित बातम्या

गोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा

पणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...

औषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी

निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...

Leopard found in Bauer Shivar
बऊर शिवारात आढळला बिबट्या

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...

solapur
सोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन 

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...

nandgav
तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले

नांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...