Sections

विठ्ठल गंगा बेंद ओढ्याच्या पुनरुज्जीवनाची योजना

अभय दिवाणजी |   शनिवार, 7 एप्रिल 2018
Solapur

सकाळ माध्यम समूह जलसंधारणासाठी करीत असलेल्या कार्यामुळेच आम्हाला बेंद ओढा पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. पुनरुज्जीवनाचे काम लवकरच सुरू करीत आहोत. 
- धनराज शिंदे, अध्यक्ष, माढा वेल्फेअर फाउंडेशन 

सोलापूर : माढा वेल्फेअर फाउंडेशनने बेंद ओढ्याच्या पुनरुज्जीवनाची योजना आखली असून त्याला "विठ्ठल गंगा' बेंद ओढा प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे.

लोकवर्गणी, सीएसआर फंड आणि शासनाच्या मदतीतून हे काम उभारण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ रविवारी (ता. 15) होणार आहे. ओढ्याच्या पुनरुज्जीवनाचे सोलापूर जिल्ह्यातील हे दुसरे मोठे आदर्श उदाहरण ठरणार आहे. या योजनेतून 34 किमीचे रुंदीकरण होईल. त्यातून 62 हजार एकर जमिनीला लाभ मिळणार आहे.  सांगोला तालुक्‍यातील कटफळ ते शेळवे अशा 42 किमी अंतराचे कासाळगंगा ओढ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोग सांगोला तालुक्‍यातील नागरिकांनी सुरू केला आहे. त्यातील 22 किमीचे काम पूर्णत्वास आले आहे. या कामामुळे ओढ्याला नदीचे रूप आले असून लोकवर्गणी, शासन निधी आणि सीएसआर फंडाची मदत मिळाली आहे. या कामासाठी नाम फाउंडेशन, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि टाटा कन्सल्टन्सीचे मोठे सहकार्य मिळाले. 

माढा तालुक्‍यातील बेंद ओढ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा माढा वेल्फेअर असोसिएशनचा विचार सुरू असतानाच पंचायत समिती सदस्य व या योजनेचे जनक असोसिएशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत कासाळगंगा ओढ्याची पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बेंद ओढ्याचे काम करण्याचा निर्धार केला. मजल दरमजल करीत अनेक शासकीय अडचणींचा सामना होत-होत अखेर या योजनेचा प्रस्ताव पूर्णत्वास आला. विशेष म्हणजे उजनीतून सीनेच्या बोगद्यात सोडलेले पाणी अतिरिक्त झाल्यास त्याचा या ओढ्याला लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा ओढा वाहता राहील. हे शाश्‍वत पाणी माढा तालुक्‍यातील काही भागास वरदान ठरणार आहे. 

माढा तालुक्‍यातील 13 गावांना लाभ  ढवळस, पिंपळखुंटे, चोबे पिंपरी, कुर्डू, कुर्डुवाडी, भोसरे, वेताळवाडी, वडाची वाडी, रणदिवे वाडी, वडशिंगे, तडवळे, उंदरगाव, महातपूर 

- 200 कोटी लिटर पाण्याची बचत होणार  - 62 हजार एकर जमिनीला पाणी मिळणार  - 13 गावांचे लाभक्षेत्र  - शासकीय निविदेनुसार नऊ कोटी 37 लाखांचा खर्च  - शासकीय निधीमध्ये 70 टक्के बचत  - ओढ्यावर 60 हून अधिक बंधारे उपलब्ध 

सकाळ माध्यम समूह जलसंधारणासाठी करीत असलेल्या कार्यामुळेच आम्हाला बेंद ओढा पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. पुनरुज्जीवनाचे काम लवकरच सुरू करीत आहोत. - धनराज शिंदे, अध्यक्ष, माढा वेल्फेअर फाउंडेशन 

Web Title: vitthal ganga bend odha project

टॅग्स

संबंधित बातम्या

चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेवून बांधा- राम शिंदे

नगर- चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना...

एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही मजुरांना वेतन नाही

मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल...

नागपूर : ऍग्रोव्हिजनच्या समारोपीय सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. व्यासपीठावर रमेश मानकर, रवी बोरटकर, डॉ. सी. डी. मायी, दत्ता मेघे, खासदार रामदास तडस व अन्य मान्यवर.
...तर गडचिरोली बायो एव्हिएशन फ्यूअलचे हब

...तर गडचिरोली बायो एव्हिएशन फ्यूअलचे हब नागपूर, ता. 26 : बांबूपासून विमानाला लागणाऱ्या इंधन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्यास एव्हिएशन फ्युअलवरील...

Sarpanch Mahaparishad
मान अन् धनातही वाढ

पुणे - 'कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव...

water
अवकाळी पावसामुळे मोहोळमधील पाणीटंचाई दूर

मोहोळ : गेल्या आठवडयात मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाफळे (ता. मोहोळ) येथील 16 सिमेंट बंधारे व 4 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले असुन...

dr.lohiya
डॉ. व्दारकादास लोहिया यांचे निधन

अंबाजोगाई - गरिब व वंचित घटकांसाठी आपले आयुष्य झिजविलेला संघर्षयात्री डॉ. व्दारकादास शालिग्राम लोहिया उर्फ बाबूजी (८१) यांचे शुक्रवारी (ता. २३)...