Sections

अत्याचार करणाऱ्यांवरही आता तडीपारची कारवाई - विश्‍वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 30 मार्च 2018
vishwas Nangre Patil

सावकारीच्या बाबतीत आपण गंभीरतेने दखल घेतोय. चोऱ्या, घरफोड्या, अवैध धंदे, महिलांच्या छेडछाडीच्या घटनांसह गुंडागर्दी रोखण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. पंढरपुरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना गंभीर आहेत. अंडरवर्ल्डसारखी गुंडागर्दी दिसून येत आहे. बाहेर राहूनही काहीजण दहशत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा गुंडागर्दीला मोडून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

सोलापूर : आजवर चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्यांचे रेकॉर्ड ठेवले जायचे. आता आम्ही विनयभंग, बलात्कार आणि लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचे रेकॉर्ड ठेवण्यास सुरवात केली आहे. अशा आरोपींवर तडीपारची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. 

वार्षिक आढावा बैठकीनिमित्त कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी सायंकाळी 'सकाळ' कार्यालयास भेट दिली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "जे चांगलं आहे ते सगळीकडे राबविले जावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव उपक्रमास खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूरसह, सोलापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांत अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांकडून तडीपारची कारवाई होत आहे. अवैध धंदेवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत, त्या तरतुदींचा वापर केला जात आहे. 

सावकारीच्या बाबतीत आपण गंभीरतेने दखल घेतोय. चोऱ्या, घरफोड्या, अवैध धंदे, महिलांच्या छेडछाडीच्या घटनांसह गुंडागर्दी रोखण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. पंढरपुरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना गंभीर आहेत. अंडरवर्ल्डसारखी गुंडागर्दी दिसून येत आहे. बाहेर राहूनही काहीजण दहशत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा गुंडागर्दीला मोडून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.  - विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

Web Title: vishwas nangre patil talks about various issues

टॅग्स

संबंधित बातम्या

डेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट

पुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...

पिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस

पिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...

मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...

टंचाई आराखड्यातील कामे सुरू करा

पुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...