Sections

उदयनराजेंनी घेतली अक्षय कुमारची सदिच्छा भेट

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 12 एप्रिल 2018
udayanraje bhosale and akshay kumar

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी या भेटीमुळे पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना मात्र सुखद धक्का मिळाला.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी या भेटीमुळे पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना मात्र सुखद धक्का मिळाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पिंपोडे बु॥ परिसरात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने पिंपोडे बु॥ परिसराचा आज दौरा केला होता. त्यावेळी बाजूलाच अक्षय कुमार याच्या 'केसरी' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी आपला मोर्चा थेट चित्रीकरणस्थळी वळवला. उदयनराजेंच्या आगळ्यावेगळ्या आगमनामुळे चित्रपटाच्या सेटवर एकच खळबळ उडाली. जो-तो चित्रीकरण सोडून उदनराजेंच्या बरोबर सेल्फी घेवू लागला. दरम्यान, एका कर्मचार्‍याने उदयनराजे आल्याची माहिती अभिनेता अक्षय कुमारला दिली.  अक्षय कुमारने उदयनराजे यांची भेट घेवून अलिंगन दिले. याबाबत दोघांचीही वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. यावेळी अक्षय कुमार म्हणाला, सातारा जिल्हा हा मला प्रथमपासूनच खूप आवडतो. यापूर्वी माझ्या खट्टा-मिठा या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण फलटण येथे झालेले आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये नेहमीच विविध हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. येथील निसर्ग भौगोलिक परिस्थिती चित्रीकरणासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या चित्रपटांच्या शुटिंगसाठी मी सातारा जिल्ह्यासाठी आग्रही असेन. यावेळी उदयनराजे यांनी अक्षय कुमारच्या सामाजिक कार्याबद्दल त्याचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील भूमीपुत्रांना या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिलेल्या रोजगाराबद्दलही त्याचे आभार मानले. उदयनराजे यांनी अक्षय कुमारला आपल्या जलमंदिर पॅलेस येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण अक्षय कुमारने आनंदाने स्विकारले. दरम्यान, आज दिवसभर उदयनराजे व अभिनेता अक्षय कुमारच्या भेटीचीच चर्चा सोशल मिडियावर पहावयास मिळत होती.

Web Title: udayanraje bhosale meet actor akshay kumar in satara

टॅग्स

संबंधित बातम्या

Superhero superhero! (Forward)
सुपरहिरोंचा सुपरबाप! (अग्रलेख)

बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...

मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...

Pune Edition Editorial Article Raj North Indian arrow on Marm
राज यांचा "उत्तर भारतीय' बाणा! (मर्म)

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

आलोक नाथ यांची "सिन्टा'तून उचलबांगडी 

मुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...

बनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...

mumbai.jpg
उल्हासनगरात झळकली डंपिंग हटावची पोस्टर्स; गाड्या रोखण्याचा इशारा

उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो...