Sections

पोलिसांच्या पेट्रोल पंपाची पाच लाखांची रोकड लंपास

परशुराम कोकणे |   सोमवार, 19 मार्च 2018
Petrol Pump

पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मारुती लक्ष्मण राजमाने (वय 56, रा. विद्या नगर, शेळगी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शहर पोलिस मुख्यालयाच्या शेजारी अशोक पोलिस चौकीच्या मागे पोलिसांचा पेट्रोल पंप आहे.

सोलापूर : शहर पोलिस आयुक्तालयाच्या पेट्रोल पंपाची पाच लाखांची रोकड हल्ला करून पळविल्याची घटना रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मारुती लक्ष्मण राजमाने (वय 56, रा. विद्या नगर, शेळगी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शहर पोलिस मुख्यालयाच्या शेजारी अशोक पोलिस चौकीच्या मागे पोलिसांचा पेट्रोल पंप आहे. चाकुने वार झाल्याने राजमाने हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाने हे रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पेट्रोल पंपाची दिवसभराची रोकड घेऊन घराकडे निघाले होते. मार्कंडेय जलतरण तलावाच्या परिसरात सहा जणांनी राजमाने यांना अडविले. चाकुने वार करून जखमी केले. झटापटीत त्यांना मारहाणही करण्यात आली. राजमाने यांच्याकडील काळ्या रंगांची बॅग हिसकावून चोरटे पसार झाले. बॅगेत पाच लाखांची रोकड होती.

घटनेची माहिती कळताच जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी.एल.माढेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. लागलीच पोलिसांची पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली, मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

Web Title: Solapur news petrol pump decoit

टॅग्स

संबंधित बातम्या

विसर्जनासाठी ‘यिन’चे हात सरसावले

पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या...

वाशीत ७१ हजारांचे दागिने पळवले

नवी मुंबई - एका ६२ वर्षांच्या महिलेचे ७१ हजार रुपये किमतीचे दागिने एका भामट्याने लुबाडून नेल्याची घटना गुरुवारी (ता. २०) भरदुपारी वाशीतील सेक्‍...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

File photo
हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी...

मिरवणुकीत आपलेपणाचे दर्शन

पुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी...