Sections

अखेर हाती लागला खून करणारा दरोडेखोर बप्पा!

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
अखेर हाती लागला खून करणारा दरोडेखोर बप्पा!

मोहोळमध्ये केला होता पोलिसावर हल्ला, मदत करणाऱ्याचा खून

सोलापूर: दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या तावडीतून निसटून जाताना पोलिस पथकावर हल्ला करून पोलिसांना मदत करणाऱ्या अबू कुरेशी याचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणात छगन ऊर्फ बप्पा गंगाराम शिंदे (वय 28, रा. जामगाव खुर्द ता. मोहोळ) हा स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. गंगाखेड (ता. परभणी) येथे उसाच्या शेतात पाठलाग त्याला अटक करण्यात आली आहे.

मोहोळमध्ये केला होता पोलिसावर हल्ला, मदत करणाऱ्याचा खून

सोलापूर: दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या तावडीतून निसटून जाताना पोलिस पथकावर हल्ला करून पोलिसांना मदत करणाऱ्या अबू कुरेशी याचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणात छगन ऊर्फ बप्पा गंगाराम शिंदे (वय 28, रा. जामगाव खुर्द ता. मोहोळ) हा स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. गंगाखेड (ता. परभणी) येथे उसाच्या शेतात पाठलाग त्याला अटक करण्यात आली आहे.

मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खून आणि दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी वैजिनाथ रामा भोसले, छगन ऊर्फ बप्पा छगन गंगाराम शिंदे व सागर हे सर्वजण मोहोळ येथील नरखेड फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 13 फेब्रुवारी रोजी सापळा लावला होता. वैजनाथ आणि त्याचे साथीदार नरखेड फाटा येथून दुचाकीवरून जाताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी पाठलाग करून मोहोळमधील शिवाजी चौकात वैजिनाथ यास अडवून ताब्यात घेतले. वैजिनाथ व त्याच्या दोघा साथीदारांनी पोलिस कर्मचारी रामनाथ बोंबीलवार यांच्या डाव्या दंडावर व सचिन मागाडे यांच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केले होते. त्यास पोलिसांनी मोठ्या धाडसाने जागेवरच पकडले होते. पळून जाणाऱ्या आरोपीपैकी छगन याने गुलशन नगर भागात अबू कुरेशी याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगाखेड परिसरात उसाच्या शेतात पाठलाग करून अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, रियाज शेख, पोलिस कर्मचारी नारायण गोलेकर, विजयकुमार भरले, गोरक्षनाथ गांगुर्डे, रवी माने, अरुण केंद्रे, सागर शिंदे, सचिन गायकवाड, बाळू चमके, राहुल सुरवसे, आनंद दिघे यांनी ही कामगिरी केली आहे.

Web Title: solapur news mohol police robber arrested

टॅग्स

संबंधित बातम्या

सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणचा सत्कार...

वालचंदनगर : दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भाला फेक मध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या रोहित भारत चव्हाणचे कळंब (ता. इंदापूर)...

अचानक आग लागून 'झायलो' जळून खाक 

तळेगाव दिघे (जि.नगर): रस्त्याने चालेल्या महिंद्रा झायलो गाडीला अचानक आग लागली. आगीत झायलो जळून खाक झाली. गाडीतील दोघेजण मात्र बचावले. तळेगाव-लोणी...

dead_body
माजलगावात तरुणीची जाळून घेऊन आत्महत्या

माजलगांव (बीड) : तरुणीने घरात कोणी नसताना जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 22) शहरातील दत्त कॉलनी भागात घडली. स्वाती सुधाकर नाईकनवरे (...

walchandnagar.
कळंबमध्ये गणेशोत्सवामध्ये भारुडामधून झाडे लावण्याचा संदेश

वालचंदनगर - कळंब (ता.इंदापूर) येथे वॉरियर्स ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवामध्ये भारुड, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. भारुडाच्या...

अधिक्षकांच्या भूमिकेमुळे पोलिसांचे मनोबल वाढले

बारामती : सावकारीच्या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे आता...