Sections

'कालव्याला सध्या पाणी पण विद्युत पुरवठा केला बंद'

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 20 मार्च 2018
मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील

महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब

मोहोळ (सोलापूर): भाजपा शासन हे शेतकरी विरोधी असून शेतकरी विरोधी धोरणामुळे तो देशोधडीला लागला आहे. सध्या कालव्याला पाणी सुटले आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केला आहे, त्यामुळे फळबागासह पिके जळू लागली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी येत्या 26 तारखेस मोहोळ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब व हलगी नाद अंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी दिली.

महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब

मोहोळ (सोलापूर): भाजपा शासन हे शेतकरी विरोधी असून शेतकरी विरोधी धोरणामुळे तो देशोधडीला लागला आहे. सध्या कालव्याला पाणी सुटले आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केला आहे, त्यामुळे फळबागासह पिके जळू लागली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी येत्या 26 तारखेस मोहोळ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब व हलगी नाद अंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी दिली.

हल्लाबोल यात्रेच्या वातावरण निर्मीतीसाठी व शेतकरी जागृतीसाठी पाटील पापरी येथे आले होते, त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे टाकळी सिकंदरचे जि. प. सदस्य शिवाजी सोनवणे सतीश भोसले, उपसरपंच अजीत भोसले, सुलतान मुलाणी, युवराज भोसले आदिसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थीत होते.

पाटील पुढे म्हणाले, सध्या आष्टी उपसा सिंचन व उजनी डाव्या कालव्याला पाणी सुटले आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केला आहे त्यामुळे पाण्याकडे बघत बसण्याशिवाय शेतकऱ्याना पर्याय नाही. पाण्यामुळे डाळींब बोर द्राक्ष केळी या फळबागा सह मका गहु भुईमुग आदी पिके जळू लागली आहेत. या वेळी पाटील यांना आतापर्यंत तालुक्यातील साठ गावांचा दौरा केला असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगीतले.

Web Title: solapur news mohol mseb light farmer ajinkya rana patil

टॅग्स

संबंधित बातम्या

सोमवारी राज्यभरात पावसाची शक्‍यता 

मुंबई : राज्यभरात अनेक दिवसांपासून दडी मारलेला वरूणराजा सोमवारपासून पुन्हा बरसणार आहे. सध्या विदर्भात सुरू असलेला पाऊस सोमवारपासून पुढील दोन...

Lehman
‘लेहमन’बुडीची दशकपूर्ती (ऋषिराज तायडे)

२००८ च्या जागतिक मंदीला या आठवड्यात दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे लेहमन ब्रदर्स या महाकाय...

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...

विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये...

रयतच्या पहिल्या शाखेस मिळणार एक कोटीचा निधी 

कऱ्हाड : माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांची आज येथील...