Sections

श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत

अभय जोशी |   मंगळवार, 24 एप्रिल 2018
vitthal rukmini

पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरु केली जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्यावेळी सांगितले गेले होते. येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज (मंगळवार) सांगितले.

पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरु केली जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्यावेळी सांगितले गेले होते. येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज (मंगळवार) सांगितले.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्राकाळात 25 ते 30 तासाहून अधिक वेळ भाविकांना दर्शनाच्या रांगेत थांबावे लागते. त्यामुळे वयोवृध्द तसेच महिला भाविकांचे कमालीचे हाल होतात. हे लक्षात घेऊन तिरुपतीच्या धर्तीवर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी टोकन पध्दत सुरु करावी अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती.

मागील आषाढी यात्रेच्या वेळी डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नवीन मंदिर समिती नियुक्त झाल्यावर कार्तिकी यात्रेपासून टोकन व्यवस्था सुरु केली जाईल असे जाहीर केले होते. तथापी कार्तिकी यात्रेवेळी मंदिर समितीला अशी व्यवस्था सुरु करता आली नव्हती. आता येत्या आषाढी यात्रेपूर्वी टोकन व्यवस्था निश्‍चितपणे सुरु केली जाईल असे आज डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शासनाने नेमलेल्या त्रिलोक सिक्‍युरिटीज सिस्टीम प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून टोकन व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे.

मंदिरा लगतचे संत तुकाराम भवन, दर्शन मंडप, बस स्थानक, रेल्वे स्थानक, विविध ठिकाणचे वाहनतळ आदींसह प्रमुख मठांच्या मिळून सुमारे तीस ठिकाणी टोकन देण्यासाठी काऊंटर सुरु करण्यात येणार आहेत. केद्र शासनाच्या योजनेतून ही सुरु केली जाणार असल्याने समितीला त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही.

टोकन पध्दतीमुळे उलाढाल वाढणार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्राकाळात गर्दीमुळे 25 ते 30 तास आणि ऐरवी दोन ते चार तास रांगेत थांबावे लागते.टोकन पध्दती सुरु झाल्यावर टोकन वर नमूद केलेल्या वेळी भाविकांना मंदिरात जाऊन झटपट दर्शन घेता येईल.भाविक रांगेत तिष्ठत उभे राहण्या ऐवजी मग बाजारपेठेत जाऊन खरेदी करु शकतील. विविध मठ, मंदिरांना भेटी देऊ शकतील त्यामुळे साहजिकच बाजारपेठेतील उलाढाल वाढण्यास मदत होईल असा विश्‍वास समितीच्या पदाधिकाऱ्यामधून व्यक्त होत आहे.

पंढरुपुरात मांस व मद्य विक्री बंदीचा ठराव मंजूर श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये मद्‌य व मांस विक्रीस बंदी करावी यासाठी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून शासनास या विषयीचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी डॉ. भोसले व सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर, रामकृष्ण महाराज वीर, विठ्ठल महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास, विठ्ठल महाराज पैठणकर, गणेश महाराज कराडकर, शाम महाराज उखळीकर आदींनी केली होती. त्याची दखल घेऊन आज तसा ठराव मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आला.

डॉ.भोसले, आमदार राम कदम, आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटून आपण या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Web Title: Shri vitthal rukmini darshan Token method before aashadi

टॅग्स

संबंधित बातम्या

#FamilyDoctor अपस्मार

आयुर्वेदात रोगांचे स्वरूप समजावताना ‘वेग’ अशी एक संकल्पना सांगितलेली जाते. या ठिकाणी वेग शब्दाने ‘जलद गती’ या अर्थाबरोबर ‘रोगाचा पुन्हा पुन्हा...

mumbai
...तर , कृत्रिम प्राणवायू विकत घेऊन जगावे लागेल      

डोंबिवली : चांगली संवर्धन केलेली झाडे मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली ही घटना नक्कीच निंदनीय आहे. आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपण...

ujwal-nikam.jpg
आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी उपयोग करा : उज्वल निकम

परभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे...

सोलापूर बाजार समितीचा राष्ट्रीय बाजार करण्याच्या हालचाली

सोलापूर : ज्या बाजार समित्यांमध्ये तीन राज्यांतून शेतमालाची आवक 30 टक्के होते त्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांचा राष्ट्रीय बाजार...

'मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मीच"

पणजी- मुख्यमंत्रीपदाचा आपण उमेदवार आहे असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला...

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू होणार 

जळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे...