Sections

दुर्गम शाळांपासून शिक्षिकांची सुटका

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 20 मार्च 2018
School

सातारा - ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनेकदा वाद-प्रतिवाद झाले.  सुगम-दुर्गम क्षेत्रात शाळांची विभागणी करून बदल्या केल्या जाणार असल्यामुळे त्यावर आक्षेप घेतले जात होते. त्यामुळे अखेरीस ग्रामविकास विभागाने फेब्रुवारीमध्ये अतिदुर्गम शाळांत महिलांना बदलीपासून सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्ह्यातील ४२३ दुर्गम शाळांपैकी ३५४ शाळांमध्ये महिलांची बदली होणार नाही. 

सातारा - ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनेकदा वाद-प्रतिवाद झाले.  सुगम-दुर्गम क्षेत्रात शाळांची विभागणी करून बदल्या केल्या जाणार असल्यामुळे त्यावर आक्षेप घेतले जात होते. त्यामुळे अखेरीस ग्रामविकास विभागाने फेब्रुवारीमध्ये अतिदुर्गम शाळांत महिलांना बदलीपासून सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्ह्यातील ४२३ दुर्गम शाळांपैकी ३५४ शाळांमध्ये महिलांची बदली होणार नाही. 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय फेब्रुवारी २०१७ पासून चर्चेचा ठरला आहे. सातत्याने नवनवीन आदेश, परिपत्रके, तसेच न्यायालयीन निकाल यामुळे ही प्रक्रिया वर्ष होऊन गेले तरीही पार पडलेली नाही. फेब्रुवारी २०१८ मध्ये ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी दुर्गम शाळांत महिलांना नियुक्‍ती देणार नसल्याचा आदेश काढून महिला शिक्षिकांना आनंदाची बातमी दिली होती. तसेच ज्या शाळांत महिला शिक्षिका जाऊ शकत नाहीत, अशा शाळांचा सर्व्हे करण्याची सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील ४२३ अवघड क्षेत्रातील शाळांचा सर्व्हे करण्यात आला.

पैकी ३५४ शाळांमध्ये महिलांना जाण्यास अनुकुलता नसल्याचे समोर आले असून, त्याची माहिती ग्रामविकास विभागाकडे देण्यात आली. त्यामुळे या शाळांपासून महिलांची सुटका झाली आहे. परंतु, महिलांनी स्वत:हून बदली मागून घेतल्यास त्यांना बदली मिळू शकते. तसेच या शाळांतील महिला शिक्षिकाही बदली करवून घेऊ शकणार आहेत.

प्रतिकूल शाळा पाटण, जावळी, महाबळेश्‍वर हा भाग डोंगराळ, वाड्यावस्त्यांचा असून, तेथे अद्यापही बहुतांश ठिकाणी दळणवळणाच्या सोयी नाहीत. पाटणला सर्वाधिक १५५ अवघड क्षेत्रातील शाळा आहेत. त्यापैकी १४ शाळांत महिलांना जाणे शक्‍य असल्याचे शिक्षण विभागाने सुचविले आहे. तालुकानिहाय अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळा आणि कंसात महिलांना प्रतिकूल शाळा अशा : जावळी ६७ (५९), खंडाळा १५ (११), कोरेगाव पाच (एक), माण २३ (२०), खटाव नऊ (पाच), कऱ्हाड १३ (नऊ), वाई २१ (१७), महाबळेश्‍वर ७५ (७३), पाटण १५५ (१४१), सातारा २१ (१८), फलटण १९ (०).

आकडे बोलतात... महिला शिक्षिका     ३६४५  झेडपी शाळा      २७०२ दुर्गम शाळा      ४२३ महिलांसाठी प्रतिकूल      ३५४ महिलांसाठी अनुकूल      ६९

Web Title: satara news school teacher

टॅग्स

संबंधित बातम्या

पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग

पुणे -  ‘बाप्पा मोरया... मोरया’ असा जयघोष करत, ढोल वाजवत, पारंपरिक वेशभूषेत फुगड्या खेळत तरुणी, महिला मोठ्या संख्येने ‘बाप्पा’ला निरोप...

dr ashok modak
शेजारधर्म अन्‌ धर्मसंकट

चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक...

Shocking Rakhi Sawant Wants To Donate Her Boobs To The Society In This Viral Video
राखी सावंत करणार 'तो' अवयव दान

मुंबई- आपल्या मृत्यूनंतर कोणी ना कोणी कुठला ना कुठला तरी अवयव दान करत असतो. परंतु, आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आलेली राखी सावंत सध्या...

अर्थमंत्री जेटलींची उद्या बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक

नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या (मंगळवार) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत बॅंकांच्या वार्षिक...

satana
सटाण्यात अभूतपूर्व वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न  

सटाणा : शहर व परिसरातील हजारो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल रविवार (ता. 23) रोजी भावपूर्ण निरोप दिला. दरवर्षी लवकर सुरु होणारी मुख्य...