Sections

कास तलावावर लगीनघाई!

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
kass-lake

कास - कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या आवाजाने कास तलावाचा परिसर भरून गेला आहे. 

कास - कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या आवाजाने कास तलावाचा परिसर भरून गेला आहे. 

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावाची उंची वाढवल्यानंतर सध्यापेक्षा पाच पट पाणीसाठा वाढेल. आता जुन्या भिंतीवरून तलावाची पाणीपातळी ३० फूट आहे. हे पाणी उन्हाळ्यात कमी पडते. धरणाच्या भिंतीतून गळती होणारे पाणी मोटारीच्या साहाय्याने पाटात उचलून पाण्याची तूट भरून काढण्याचा प्रयत्न पालिकेकडून दर वर्षी उन्हाळ्यात होतात. नवीन भिंतीमुळे गळती थांबण्याबरोबरच पाणीसाठ्यात वाढ होऊन सातारा शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. कास तलावाची उंची वाढविण्याचे सध्या काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध यंत्रासह कामगारांच्या वावराने कास तलावाचा परिसर गजबजला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात बुडून जाणारी व भिंतीच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडून कास पठारावर वन विभागाचे ताब्यात देण्यात आली आहे. राजमार्ग व चेक नाक्‍यावर ही झाडे एकत्र करून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

Web Title: satara news kaas lake

टॅग्स

संबंधित बातम्या

Chandrakant Patil
अपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील

मुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य...

Municipal-Revenue
पिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला

पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...

File photo
जानेवारीतच 29 गावांत टॅंकर

अमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...

Katie with children
दत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ!

न्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...

live photo
टाकरखेडा येथे अतिसाराची लागण; शंभरहून अधिक जणांना त्रास 

जळगाव ः टाकरखेडा (ता. एरंडोल) येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गावात अतिसाराची लागण झाली आहे. यामुळे गावातील साधारण शंभर महिला व पुरुषांना...

गरीबाच्या ताटातील भाकरही महागली

ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत...