Sections

कॉंग्रेसच्या जाहिरातीवर राज ठाकरे यांचे "कार्टून' 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 4 मे 2018

सांगली - कॉंग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी थेट राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राची मदत घेतली आहे. राज यांच्या कुंचल्यातून नीरव मोदी बॅंक घोटाळा प्रकरणी लक्षवेधी व्यंगचित्र साकारले होते. ते कॉंग्रेसने डिजीटल फलकावर वापरले असून तो फलक सांगलीत कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात झळकला. विशेष म्हणजे या मेळाव्याला कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री हजर होते. 

सांगली - कॉंग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी थेट राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राची मदत घेतली आहे. राज यांच्या कुंचल्यातून नीरव मोदी बॅंक घोटाळा प्रकरणी लक्षवेधी व्यंगचित्र साकारले होते. ते कॉंग्रेसने डिजीटल फलकावर वापरले असून तो फलक सांगलीत कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात झळकला. विशेष म्हणजे या मेळाव्याला कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री हजर होते. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाषण आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्लाबोल करताहेत. राज हे प्रसिद्ध व्यंगचित्रकारही आहेत. मोदी सरकारच्या काळातील विविध घोटाळे, भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये यावर त्यांनी जोरदार फटकारे मारले आहेत. त्यातील नीरव मोदीच्या बॅंक घोटाळ्याची फार चर्चा झाली. अकरा हजार कोटींचा हा घोटाळा करून नीरव मोदी पसार झाला. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारावेळी "मला प्रधानमंत्री नव्हे तर चौकीदार करा', असे आवाहन केले होते. नेमका त्या मुद्याला हात घालत राज यांनी व्यंगचित्र रेखाटलेले आहे. ते चांगलेच चर्चेत आले, गाजले होते. 

कॉंग्रेसने आजच्या शिबिरासाठी वेगवेगळ्या व्यंगचित्रांचे डिजीटल फलक करून सभागृहात लावले होते. त्यापैकी एक डिजीटलसाठी थेट राज यांच्या व्यंगचित्राची मदत झाली आणि सभागृहात तेच लक्षवेधी होते. राज भविष्यात भाजपला विरोध करताना कॉंग्रेसला "हात' देतील की नाही, सांगता यायचे नाही, मात्र कॉंग्रेसने मात्र त्यांचा व्यंगचित्राचा "हात' मदतीला घेतला आहे. 

Web Title: Sangli News Raj Thakare cartoon on Congress advertise

टॅग्स

संबंधित बातम्या

amol udgirkar
बायो'पीक' (अमोल उदगीरकर)

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली....

sundeep waslekar
हवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)

विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...

dr sanjay dhole
अतिसूक्ष्म विज्ञानाची गरुडझेप (डॉ. संजय ढोले)

नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते...

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'

हिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...