Sections

सांगलीत रंगलाय राष्ट्रवादीतच हल्लाबोल

बलराज पवार |   बुधवार, 4 एप्रिल 2018

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज (बुधवारी) सांगलीत दाखल होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते सांगलीत येणार आहेत. राज्यभरात सत्ताधारी युतीला लक्ष्य करून उभारलेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असताना सांगलीत मात्र पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात यात्रेला फारशी किंमत दिलेली दिसत नाही.

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज (बुधवारी) सांगलीत दाखल होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते सांगलीत येणार आहेत. राज्यभरात सत्ताधारी युतीला लक्ष्य करून उभारलेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असताना सांगलीत मात्र पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात यात्रेला फारशी किंमत दिलेली दिसत नाही.

इस्लामपूरच्या सभेसाठी आमदार जयंत पाटील यांनी जोरदार तयारी केली असली तरी सांगली, तासगावसह अन्य तालुक्‍यात दुर्लक्षच केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फक्त वाळव्यातच आहे का? असा सूर उमटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज सकाळी आटपाडीतून सुरू होत आहे. दुपारी जत, सायंकाळी  मिरज आणि रात्री सांगली असा पहिल्या दिवशीचा दौरा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात चर्चा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रा यशस्वी करा, असा आदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

जिल्ह्यात राष्ट्रवादी दुबळी झाली असताना कार्यकर्त्यांची मोट बांधून हल्लाबोल यात्रेची तयारी करण्याची गरज होती. प्रत्यक्षात वाळवा तालुका वगळता जिल्ह्यात कुठेही जोमाने तयारी सुरू असलेली दिसत नाही. पण तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली, मिरजेत काहीच हालचाल दिसत नाही. जत तालुक्‍यात तर आजच पक्षातील वादावादी चव्हाट्यावर आली.

अंतर्गत वादात अडकला पक्ष सांगलीत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात वाद नाहीत असा दावा करण्यात येत असला तरी त्यात तथ्य नाही. त्यांच्यातील वाद कायम आहे. कमलाकर पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी १४ गावांची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या गटाने गावागावात फिरून हल्लाबोल यात्रेसाठी बैठका घेतल्या. मात्र, सांगली शहरात तशा बैठका झाल्याचे दिसले नाही. उलट राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजप, काँग्रेसच्या वाटेवर अशाच चर्चा पुन्हा ऐन हल्लाबोल यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाल्या. संजय बजाज यांच्याकडे शहराची जबाबदारी आहे. त्यांच्याविरोधात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून असंतोष व्यक्त केला. मात्र त्यावर प्रदेशकडून कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हल्लाबोल यात्रेकडे नगरसेवकांनीच पाठ फिरवल्याची चर्चा आहे. 

अनेक नेते नाराज राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे अंतर्गत वादाचा प्रश्‍न केवळ सांगलीतच आहे असे नाही. वाळव्यातील नाराजीचा फटका नगरपालिका, जिल्हा  परिषद निवडणुकीत पक्षाला बसला आहे. दिलीप पाटील यांनीही विधान परिषद निवडणुकीवेळी नाराजी व्यक्त  केली होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष होण्याची त्यांची सुप्त इच्छा अजून पूर्ण होत नाही. चिरंजीव संग्राम यांना तरी किमान युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष करावे अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. पण तेही जमत नाही. इतर तालुक्‍यात दमदार नेते नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये  कुरबुरी आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी जमत नसेल तर पद सोडा असे सांगितले आहे. पण, करायचे काही नाही अन्‌ पदही सोडायचे नाही असेच चित्र दिसत आहे. अशा स्थितीत हल्लाबोल यात्रेत अजितदादा कोणता कानमंत्र देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sangli News NCP Hallabol rally special story

टॅग्स

संबंधित बातम्या

दुष्काळाचा कृती कार्यक्रम हाती घ्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्‍चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला...

#PmcIssues 'स्मार्ट' पुण्याची टॉयलेट्‌स मात्र 'वर्स्ट' ! 

पुणे : तुटलेले दरवाजे, पाण्याचा अभाव, खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा, नळच गायब... जागोजागी कचरा..... हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक...

काँग्रेसचा सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48...

vijay tarawade
आठवणी...साहित्याच्या, साहित्यिकांच्या (विजय तरवडे)

मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका...

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...