Sections

सांगली जिल्ह्यातील २८५ गावे मध्यम दुष्काळी जाहीर

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 15 मार्च 2018

सांगली - खरिपाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या २८५ गावांना मध्यम दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले. तेथील शेतकऱ्यांच्या शेती कर्जाच्या वसुलीला स्थगितीसह वीज बिलात सवलत व अन्य सवलती मिळणार आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी हा निर्णय जाहीर केला. 

सांगली - खरिपाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या २८५ गावांना मध्यम दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले. तेथील शेतकऱ्यांच्या शेती कर्जाच्या वसुलीला स्थगितीसह वीज बिलात सवलत व अन्य सवलती मिळणार आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी हा निर्णय जाहीर केला. 

सन २०१७-१८ मधील खरिपाची पैसेवारी नुकतीच जाहीर झाली. पर्जन्यमान, शेती उत्पादन, त्याचे नुकसान याआधारे २८५ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आली. त्या गावांना मध्यम दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मिरज तालुक्‍यातील ३९, तासगावच्या ६९, कवठेमहांकाळच्या ६०, जतच्या ५० आणि खानापूरच्या ६७ गावांचा त्यात समावेश आहे. मध्यम दुष्काळी गावांना शासनाच्या विशेष सवलती मंजूर आहेत. 

जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंकरचा वापर अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. टंचाईग्रस्त गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

तालुकावार मध्यम दुष्काळी गावे  मिरज - आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, संतोषवाडी, जानराववाडी, मालगाव, खंडेराजुरी, गुंडेवाडी, पायाप्पाचीवाडी, एरंडोली, व्यंकोचीवाडी, शिपूर, डोंगरवाडी, बेळंकी, कदमवाडी, सलगरे, चाबुकस्वारवाडी, बुधगाव, बिसूर, कानडवाडी, कावजी खोतवाडी, वाजेगाव, मानमोडी, कवलापूर, रसूलवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी, तानंग, कळंबी, सिद्धेवाडी, सोनी, करोली एम, भोसे, पाटगाव, मल्लेवाडी. 

तासगाव - तासगाव, वासुंबे, कवठेएकंद, चिंचणी, भैरववाडी, नागाव (क), मतकुणकी, बेंद्री, शिरगाव, कुमठे, येळावी, जुळेवाडी, तुरची, राजापूर, ढवळी, वंजारवाडी, निमणी, नागाव (नि), नेहरूनगर, विसापूर, पाडळी, हातणोली, धामणी, हातनूर, गोटेवाडी, शिरगाव, पानमळेवाडी, लिंब, बोरगाव, आळते, लिंबळक, चिखलगोठण, मांजर्डे, आरवडे, तासगाव पुणदी, पेड, मोराळे पेड, धोंडेवाडी, बलगवडे, गौरगाव, विजयनगर, नरसेवाडी, किंदरवाडी, कचरेवाडी, सावळज, सिद्धेवाडी, डोंगरसोनी, अंजनी, नागेवाडी, वडगाव, लोकरेवाडी, जरंडी, दहीवडी, वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, बस्तवडे, मणेराजुरी, योगेवाडी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, खुजगाव, वाघापूर, कौलगे, लोंढे, डोर्ली, उपळावी, धुळगाव.

कवठेमहांकाळ - कवठेमहांकाळ, जाधववाडी, झुरेवाडी, लांडगेवाडी, शिरढोण, जायगव्हाण, अलकूड (एस), नांगोळे, रांजणी, लोणारवाडी, कोकळे, करलहट्टी, बसाप्पाचीवाडी, कुची, जाखापूर, तिसंगी, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, घाटनांद्रे, रायवाडी, नागज, आरेवाडी, केरेवाडी, आगळगाव, शेळकेवाडी, देशिंग, मोरगाव, हारोली, बनेवाडी, घरसिंग, बोरगाव, अलकूड (एम), मळणगाव, हिंगणगाव, शिंदेवाडी, विठुरायाचीवाडी, थबडेवाडी, अग्रण धुळगाव, पिंपळवाडी, करोली (टी), म्हैसाळ (एम), रामपूरवाडी, कोनगोळी, कुटकोळी, सराटी, ढालगाव, कदमवाडी, घोरपडी, शिंदेवाडी, निमज, दुधेभावी, ढोलेवाडी, चोरोची, चुडेखिंडी, जांभूळवाडी, इरळी, मोगमवाडी, लंगरपेठ, ढालेवाडी.

जत - रामपूर, साळमळगेवाडी, खिलारवाडी, शिंदूर, बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, बनाळी, अंत्राळ, वायफळ, शिंगणहळ्ळी, मोकासेवाडी, अवंढी, लोहगाव, येळवी, खैराव, टोणेवाडी, बिरनाळ, कोसारी, वाळेखिंडी, तिप्पेहळ्ळी, नवाळवाडी, धाबडवाडी, हिवरे, प्रतापूर, गुळवंची, डफळापूर, खलाटी, शिंगणापूर, जिरग्याळ, शेळकेवाडी, एकुंडी, मिरवाड, बाज, बेळुंखी, अंकले, डोर्ली, कंठी, वाशाण, बागेवाडी, तिल्याळ, सालेकिरी, माडग्याळ, सोन्याळ, लकडेवाडी, जाडरबोबलाद, सनमडी, कोळगिरी, भिवर्गी, करेवाडी.

खानापूर - विटा, माहुली, नागेवाडी, चिखलहोळ, वलखड, हिंगणगादे, गार्डी, धानवड, पारे, कुर्ली, घाडगेवाडी, बामणी, मंगरूळ, चिंचणी (मं), कार्वे, भाळवणी, पंचलिंगनगर, आळसंद, वाझर, कमळापूर, बलवडी, तांदळगाव, जाधवनगर, ढवळेश्‍वर, कळंबी, खंबाळे, लेंगरे, भूड, माधळमूठी, देवखिंडी, वाळूज, वेजेगाव, साळशिंगी, देवनगर, भेंडवडे, भाग्यनगर, सांगोले, जोंधळखिंडी, भिकवडी, खानापूर, रामनगर, ऐनवाडी, जखीणवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, रेवणगाव, धोंडगेवाडी, रेणावी, वासुंबे, भांबर्डे, करंजे, मोही, पळशी, बेनापूर, ताडाचीवाडी, हिवरे, कुसबावडे, धोंडेवाडी, भडकेवाडी, शेंडगेवाडी, बलवडी (खा), मेंगाणवाडी, बानूरगड, सुलतानगादे.

Web Title: Sangli News moderate drought declares in 285 villages

टॅग्स

संबंधित बातम्या

मालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...

एकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य...

Onion
४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये

वडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...

बाळासाहेब बोडके
जिलेटीनच्या स्फोटात शेतकरी ठार

सिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा...

saswad.jpg
सरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)

सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...

Farmer-Strike
आता 'देता की जाता' 

पुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान...