Sections

कोल्हापूर ते बीदर नवी साप्ताहिक एक्‍सप्रेस लवकरच

संतोष भिसे |   शुक्रवार, 4 मे 2018

मिरज, ता. 4 : कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस लवकरच सुरु होत आहे. मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव पाठवला होता, त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. 

मिरज, ता. 4 : कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस लवकरच सुरु होत आहे. मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव पाठवला होता, त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. 

वीस डब्यांची ही गाडी ( 11415) प्रत्येक बुधवारी रात्री 11.35 वाजता कोल्हापुरातून सुटेल. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी 10.15 वाजता बीदरमध्ये पोहोचेल. दिड तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पावणेबारा वाजता परत कोल्हापूरसाठी (क्रमांक 11416) सुटेल, रात्री 12.35 वाजता कोल्हापुरात पोहोचेल. 

या गाडीला भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, पंढरपूर आणि मिरज हे थांबे आहेत. एकूण वीस डबे असून नऊ स्लिपर, तीन वातानुकुलीत, सहा जनरल डब्यांचा समावेश आहे. 

या गाडीला क्रमांक मिळाल्याने कायमस्वरुपी धावणार आहे. कोल्हापूर-नागपूर ही एक्‍सप्रेस कोल्हापुरात चार दिवस थांबून असते, या काळात ती कोल्हापूर - बीदर एक्‍सप्रेस म्हणून धावेल. गाडी कधीपासून धावेल हे मध्य रेल्वेने अद्याप स्पष्ट केलेले नाही, मात्र पंधरवड्यात सुरु होण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

पाठपुराव्याला यश  प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील आणि प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, या गाडीसाठी बरेच दिवस पाठपुरावा सुरु होता. या गाडीने पश्‍चिम महाराष्ट्र कर्नाटकशी जोडला जाणार आहे. प्रवाशांची चांगली सोय होईल. 

Web Title: Sangli News Kolhapur - Bidar weekly Railway

टॅग्स

संबंधित बातम्या

रिकर्व्ही बेसविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार : राजू शेट्टी 

कऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के...

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...

crime
मुलीचे अपहरण करून बलात्कार; मुलगी सात महिन्याची गर्भवती

सदर-  मैत्रिणीच्या घरी पायी जाणाऱ्या 17 वर्षीय मुलीला सहा महिन्यांपूर्वी एका युवकाने बेशुद्ध करून अपहरण केले. तिच्यावर रस्त्याच्या कडेला झुडूपात...

Congress
मासळीत फॉर्मेलीन सापडल्याचा काँग्रेसचा दावा

मडगाव- गोवा येथील एसजीपीडीए मार्केटमध्ये केलेल्या चाचणीत मासळीमध्ये फाॅर्मेलीन या घातक द्रव्याsचे अंश सापडल्याचा दावा काॅंग्रेसने केला आहे....

विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये...