Sections

कराड - आटपाडी एसटी बसला डंपरची धडक, तीन ठार

विजय पाटील |   मंगळवार, 24 एप्रिल 2018

सांगली - विटा जवळील रेवणगांव घाटात धोकादायक वळणात एसटी आणि डंपरची धडक झाली. या अपघातात महिलेसह ३ जण ठार झाले आहेत तर ४ जण गंभीर जखमी आहेत.

सांगली - विटा जवळील रेवणगांव घाटात धोकादायक वळणात एसटी बस आणि डंपरची धडक झाली. या अपघातात महिलेसह ३ जण ठार झाले आहेत तर ४ जण गंभीर जखमी आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  रेवणगांव घाटात धोकादायक वळणे आहेत. एक वळणावर कराड -आटपाडी एसटी ( एमएच 12 सीएच 7670) याबसला आणि विटाकडून येत असलेल्या डंपरची ( एमएच 10 ए डल्बु 2767) धडक झाली. या धडकेनंतर डंपर रस्त्याच्या बाजूला उलटला. तर एसटीला बसलेल्या घडकेत तीन प्रवासी जागीच ठार झाले.

मृतांची नावे अशी - विजय जालिंदर कुंभार ( रा. खानापूर), तानाजी विलास जाधव (भडकेवाडी, ता. खानापूर) , सुनदा उत्तम यादव (वाटबरे,  ता. सागोला. जि.सोलापूर) 

या घटनेत चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना विटा आणि खानापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... 

Web Title: Sangli News Karad-Atpadi Bus accident near Vita

टॅग्स

संबंधित बातम्या

शेतकऱ्याचा तिखट संताप

सोलापूर - पावसाअभावी खरीप वाया गेला, कर्जमाफीचा लाभ मिळेना, बॅंकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीतून मिळालेल्या...

File photo
हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी...

girl
चिमुकलीवर अत्याचार करून घेतला नाकाचा चावा

औंध (पुणे) : तीन वर्षीय चिरमुडीवर लैंगिक अत्याचार करून व तिच्या नाकाचा चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पाषाण येथे घडली. याप्रकरणी...

A rare snake found in the Bhaipur rehab at Aarvi
भाईपुर पुनर्वसनात आढळला दुर्मिळ असलेला काळडोक्या साप

आर्वी (जि वर्धा) - आर्वी तालुक्यातील भाईपुर येथील रहिवाशी गजानन आहाके यांच्या इथे त्यांना साप आढळून आला असता त्यांनी आर्वी येथील पीपल्स फॉर ॲ...

One died because of drowning in Biloli taluka
श्री विसर्जनासोबत एकाचा बुडून मृत्यू; बिलोली तालुक्यातील घटना

बिलोली : श्री विसर्जनावेळी नदी पात्रात उतरलेल्या एका गणेशभक्ताचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी मांजरा नदी पात्रात...