Sections

मिरजेतील प्रसिद्ध सतारमेकर गल्लीत आग

संतोष भिसे |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मिरज - येथील सतारमेकर गल्लीत स्वरसंगम म्युझीकल हाऊस या दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली. आगीमध्ये मोठ्या संख्येने तंतुवाद्ये आणि  गोदाम जळून खाक झाले. सुमारे पन्नास लाखांची हानी झाल्याचा  अंदाज आहे. शाँर्टसर्कीटमुळे आग लागल्याचाही प्राथमिक अंदाज आहे.

मिरज - येथील सतारमेकर गल्लीत स्वरसंगम म्युझीकल हाऊस या दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली. आगीमध्ये मोठ्या संख्येने तंतुवाद्ये आणि  गोदाम जळून खाक झाले. सुमारे पन्नास लाखांची हानी झाल्याचा  अंदाज आहे. शाँर्टसर्कीटमुळे आग लागल्याचाही प्राथमिक अंदाज आहे.

भर बाजारपेठेत आग लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या दुकानाच्या दोन्ही बाजूंना तंतुवाद्याची दुकाने, सराफी पेढ्या आणि व्यापारी संस्था आहेत. मिरजेतील प्रसिद्ध तंतुवाद्ये, सतारी, तंबोरे आणि अनेक प्रकारची वाद्ये याच बाजारपेठेत तयार करुन विकली जातात.  महाराष्ट्रभरातून ग्राहकांची दररोज गर्दी असते.  

आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रियाज अब्दुलकादर सतारमेकर यांच्या स्वरसंगम या दुकानातून धुराचे लोट निघाले, पाठोपाठ आगीचा भडका उडाला. काही समजण्यापुर्वीच आगीने संपुर्ण दुकान आणि त्याच्या मागील बाजुचे गोदाम वेढले. सतरमेकर कुटुंबातील सदस्य आणि दुकानातील कामगारांनी पळून जाऊन जीव वाचवला. 

दुर्घटनेत तयार तंतुवाद्ये, सतारीचे साहीत्य, भोपळे, परदेशी बनावटीची वाद्ये, वाद्यनिर्मितीची यंत्रे, साधने व हत्यारे भस्मसात झाली. महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते.  नागरीकांनी दुकानाच्या भिंती पाडून आग आजुबाजुला  पसरण्याला प्रतिबंध केला. दुर्घटनेमुळे निम्मी सराफ पेठ बंद झाली. अग्नीशमन दलाच्या बंबातीला पाणी संपल्याने मदतकार्य खंडीत झाले. या दुर्घटनेने मिरजेतील सतारमेकर गल्ली हादरुन गेली.

Web Title: Sangli News Fire incidence in Satarmekar Galli in Miraj

टॅग्स

संबंधित बातम्या

pali
रायगड : सुधागड तालुक्यात मतदान शांततेत

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 7 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रक्रीया बुधवारी शांततेत पार पडली. दुपारी दिड वाजेपर्यंत एकूण 31.50 टक्के...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित...

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा...

"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व...