Sections

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 10 मे 2018

इस्लामपूर - बहुजन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा हातभार लावून सर्वसामान्यांचे स्थान उंचावण्याचे काम करणाऱ्या  कर्मवीर भाऊराव पाटील यांना केंद्र शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा, या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. 

इस्लामपूर - बहुजन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा हातभार लावून सर्वसामान्यांचे स्थान उंचावण्याचे काम करणाऱ्या  कर्मवीर भाऊराव पाटील यांना केंद्र शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा, या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. 

आमदार जयंत पाटील म्हणाले,‘‘कर्मवीर अण्णांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता शैक्षणिक चळवळ उभी केली. आज महाराष्ट्र शिक्षण आणि ज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. त्यात कर्मवीर अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक प्रगतीचा पाया त्यांनी रोवला.  त्यामुळे शाळा निघू लागल्या. बहुजन समाजाला ज्ञानाची कवाडे कायमची खुली झाली. सर्वसामान्यांचे जीवनमान निश्‍चित उंचावले.

बनारस विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांना यापूर्वी केंद्र शासनाने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले आहे. महाराष्ट्रात शिक्षणाचा श्रीगणेशा महात्मा फुले यांनी केला. त्यापाठोपाठ खेडोपाड्यात जाऊन, युवकांना संघटित करून शिक्षण देण्याचे काम कर्मवीर अण्णांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून भारतरत्नसाठी महाराष्ट्र राज्यातर्फे केंद्राकडे शिफारस करावी यासाठी विनंती करत आहे.’’

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात ते म्हणाले, ‘‘पक्षाने विश्‍वजित कदम यांना पाठिंबा देत असताना अरुण लाड व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पाठिंबा दिला आहे. विश्‍वजित कदम हे या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येतील यात शंका नाही.’’ प्रदेशाध्यपदाच्या निवडीनंतर पक्षाच्या धोरणासंदर्भात ते म्हणाले,‘‘राष्ट्रवादी पक्ष बांधणीला प्राधान्य दिले जाईल.’’

कर्नाटकात काँग्रेसच्या जागा वाढतील कर्नाटक निवडणुकीविषयी आमदार जयंत  पाटील म्हणाले,‘‘कर्नाटक निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये सर्वत्र सरळ लढत होत आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या जागा वाढतील.

Web Title: Sangli News BharatRatna give to Bhaurao Patil

टॅग्स

संबंधित बातम्या

world chess championship 2018
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरींची कोंडी कायम

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८ नॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक...

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...