Sections

"म्हैसाळ' च्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा 

संतोष भिसे |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
मिरज - म्हैसाळ सिंचन योजनेचा उपसा त्वरित सुरू करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. 

मिरज -  म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी आज रस्त्यावर उतरले. मिरजेत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. आठवड्यात योजना सुरू झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

मिरज -  म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी आज रस्त्यावर उतरले. मिरजेत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. आठवड्यात योजना सुरू झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, पंचायत समितीतील प्रतोद अनिल आमटवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, आप्पासाहेब हुळ्ळे, प्रा. सिद्धार्थ जाधव, शिवसेनेचे संजय काटे, चंद्रकांत मैगुरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील यांनी नेतृत्व केले. 

10 मार्चला रास्तो रोको  योजनेच्या पाणीपट्टीचा सातबारावर चढवलेले बोजे त्वरित कमी करावेत. पाणीवापर संस्था तत्काळ स्थापन कराव्यात. मागील बिल माफ करावे. आठ मार्चपर्यंत उपसा सुरू झाला नाही, तर 10 मार्च रोजी पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको केला जाईल. पुढील टप्प्यात आंदोलन आणखी तीव्र करू. 

किसान चौकातून मोर्चा सुरू झाला. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत श्रीकांत चौकमार्गे तहसील कार्यालयावर तो गेला. तेथे जोरदार घोषणाबाजी झाली. "पाणी आमच्या हक्‍काचे' असे ठणकावत उपसा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. 

श्री. कोरे म्हणाले, ""पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करीत आहे. योजना सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.'' 

श्री. शिंदे म्हणाले,""उपसा सुरू झाला नाही हजारो एकर बागायत मातीमोल ठरेल. शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसेल. पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागेल.'' 

श्री. आमटवणे म्हणाले,""शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी देणेघेणे नसल्यासारखी भाजप सरकारची वागणूक आहे. मार्च उजाडला तरी उपसा सुरू झालेला नाही. यापूर्वीची थकबाकी टंचाईनिधीतून भागवून योजनेचा उपसा त्वरित सुरू करावा.'' 

सुभाष खोत म्हणाले,""सरकारचे धोरण शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. योजना सुरू न झाल्यास मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ व सांगोला तालुक्‍यांतील शेती धोक्‍यात येणार आहे.'' 

नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे, सुभाष पाटील, संभाजी पाटील, विष्णू पाटील, बाळासाहेब नलवडे, गणेश देसाई, सुरेश कोळेकर, बाबासाहेब शिंदे, मौलाअली मुजावर, प्रमोद इनामदार, पप्पू शिंदे, शिवाजी महाडिक, गंगाधर तोडकर, वास्कर शिंदे, तानाजी सातपुते, गुलाबराव भोसले, अशोक रजपूत, अनिता कदम, संकेत परब, अख्तरपाशा पटेल, प्रशांत माळी, आशा कुंभार, सुरेखा पाटील, रमेश भोसले, अजित ढोले, रफिक मुजावर, सदाशिव खाडे, खंडेराव जगताप, तुषार खांडेकर, रावसाहेब पाटील आदी सहभागी झाले. 

 

Web Title: Sangli News agitation for Mheshal water

टॅग्स

संबंधित बातम्या

Parbhani Womens agitation on Friday for the government college
परभणी : शासकीय महाविद्यालयासाठी शुक्रवारी महिलांचे घेराव आंदोलन

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समस्त परभणीकरांच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाचा तीसरा टप्पा शुक्रवारी (ता. 21)...

pune
शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील....

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

asmita-yojana
अस्मिता योजनेत अनेक अडचणी

महाड : महिलांच्या आरोग्याचा विचार करुन सरकारने सॅनिटरी नॅपकीनचा वापर, प्रसार आणि वितरणाकरीता अस्मिता योजना सुरू केली, परंतु किचकट प्रक्रिया व...

crime
कारखान्यातून आठ लाखांची रसायन चोरी, तिघे अटक

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील सिक्वेंट सायंटिफिक या कारखान्यातून आठ लाख रुपये किंमतीच्या सिल्व्हर नायट्रेट या उत्प्रेरकची चोरी करणाऱ्या तिघांना...