Sections

प्राध्यापिकेचा 101 पिंपळ बोन्साय वाटण्याचा संकल्प 

परशुराम कोकणे  |   गुरुवार, 19 एप्रिल 2018
solapur

सोलापूर- बोधीवृक्ष म्हणून ओळख असलेल्या पिंपळाचे झाड घराघरांत असावे, या विचारातून पर्यावरण अभ्यासिका प्रा. आशा रोकडे-कीर्तिकर यांनी एक आगळावेगळा संकल्प केला आहे. 101 पिंपळाच्या झाडाचे बोन्साय करून वाटण्याचा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात येत असून, आजवर 27 बोन्सायचे वाटप करण्यात आले आहे. 

सोलापूर- बोधीवृक्ष म्हणून ओळख असलेल्या पिंपळाचे झाड घराघरांत असावे, या विचारातून पर्यावरण अभ्यासिका प्रा. आशा रोकडे-कीर्तिकर यांनी एक आगळावेगळा संकल्प केला आहे. 101 पिंपळाच्या झाडाचे बोन्साय करून वाटण्याचा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात येत असून, आजवर 27 बोन्सायचे वाटप करण्यात आले आहे. 

प्रा. रोकडे या संगमेश्‍वर महाविद्यालयात कार्यरत आहेत. बोन्सायबाबतचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी महिला बचत गटाच्या सदस्यांनाही बोन्साय कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. घरात आई हिराबाई, मुलगा सौरभ, वहिनी प्रियांका कांबळे यांच्या सहकार्याने प्रा. रोकडे यांनी बोन्साय तयार करायला सुरवात केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी 101 पिंपळाचे बोन्साय करून भेट देण्याचा संकल्प केला. आजवर मित्र, नातेवाईक यांच्या कार्यक्रमांना, वाढदिवसांना 27 बोन्साय भेट दिले आहेत. 

दीड फुटाची उंची...  वनस्पतिशास्त्रात पिंपळाला फायकस रिलिजिओस असे नाव आहे. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते, म्हणून याला अक्षय वृक्षही म्हटले जाते. हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. तापमान नियंत्रित ठेवतो. जिथे पिंपळाचे झाड त्या परिसरातील तापमान चार अंशाने कमी असल्याचे समोर आले आहे. 10 ते 15 मीटरपर्यंत वाढणाऱ्या या पिंपळाच्या वृक्षाला बोन्साय म्हणजेच मोठ्या झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती केली जात आहे. दीड फुटाचे पिंपळाचे बोन्साय खूपच लक्ष वेधक असून घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते, असे प्रा. रोकडे यांनी सांगितले. 

पिंपळ हे सर्वाधिक ऑक्‍सिजन देणारे झाड आहे. गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखालीच ध्यान साधना केली होती. कुटुंबीयांच्या मदतीने पिंपळाचे बोन्साय बनवून वाटण्याचा संकल्प मी केला होता. आजवर मित्र, नातेवाइकांच्या कार्यक्रमांमध्ये, वाढदिवसाला 27 बोन्साय वाटप केले आहेत.  - प्रा. आशा रोकडे-कीर्तिकर 

Web Title: Resolution of sharing 101 pimple bonsai

टॅग्स

संबंधित बातम्या

Wrist-Veins
मनगटाच्या शिरांवर दाब

आपल्या हातांच्या पंजांतील ताकद कमी झाल्यासारखी किंवा पंजा बधिर झाल्यासारखा वाटतो का? कदाचित ‘कार्पल टनेल सिंड्रोम’ झाला असण्याची शक्‍यता आहे. संगणक,...

सौंदलग्याजवळील अपघातात बसर्गेतील जवान ठार

निपाणी - पुढे जाणाऱ्या वाहनाला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील जवान ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 20) रात्री उशिरा घडली. पुणे-बंगळूर...

Two-Way-Speaker
टू वे स्पीकरला सशर्त परवानगी

औरंगाबाद - ध्वनिमर्यादेत टू वे स्पीकर वाजविण्यास पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी परवानगी दिली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे...

Dog-Bite
रोज डझनभर नागपूरकांना मोकाट श्‍वानांचा चावा

नागपूर - नसबंदी शस्त्रक्रियेची मोहीम थंड झाल्याने शहरातील गल्लीबोळ व वस्त्यांमध्ये मोकाट श्‍वानांची पिलावळ वाढली आहे. या श्‍वानांनी सात वर्षांत ३१...

सीमाभागासाठी ‘गोकुळ’ मल्टिस्टेट हवाच

निपाणी - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याची हालचाल सुरू असून तसा संचालक मंडळाचा आग्रह आहे.  कर्नाटक...