Sections

प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) केला अंतिम फेरीत प्रवेश

संदीप खांडेकर |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
football

कोल्हापूर: महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर १-०ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांच्या राहुल पाटील याने केलेला गोल निर्णायक ठरला. महापालिकेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे.

कोल्हापूर: महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर १-०ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांच्या राहुल पाटील याने केलेला गोल निर्णायक ठरला. महापालिकेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे.

पूर्वार्धात बालगोपालच्या सचिन गायकवाड, श्रीधर परब यांनी प्रॅक्टिसच्या बचावफळीत शिरकाव करत गोलचा प्रयत्न केला. फ्रान्सिस, सुशील सावंत यांनी बचावफळी भक्कम ठेवत बालगोपालच्या खेळाडूंची कोंडी केली. याच वेळेत प्रॅक्टिसच्या इंद्रजित चौगुलेच्या पासवर कैलास पाटील गोल करण्यात कमी पडला. त्याला चेंडू बालगोपालच्या गोलजाळीसमोर मिळाला होता. चेंडूस त्याने दिशाहीन फटका मारला. त्यानंतरच्या चढाईत इंद्रजितने मारलेला फटका बालगोपालचा गोलरक्षक निखिल खन्ना याने उत्कृष्टरित्या अडवला. परतलेल्या चेंडू कैलासने छातीने गोलजाळीत ढकलला. तो आॅफसाईडला असल्याने प्रॅक्टिसला हा गोल बहाल करण्यात आला नाही.

उत्तरार्धात बालगोपालच्या सौरभ सालपे याने प्रॅक्टिसच्या डाव्या बगलेतून चेंडू गोलजाळी क्षेत्रात नेला. चेंडूचा पास देण्याकरिता प्रॅक्टिसच्या गोलजाळीसमोर एकही खेळाडू नसल्याने त्याची अडचण झाली. त्याने चेंडूस दिशाहीन फटका मारला. प्रॅक्टिसच्या खेळाडूंना बालगोपालची बचावफळी भेदता येत नव्हती.  त्यांच्या चढायांत आक्रमकता नव्हती. बालगोपालची स्थिती याहून वेगळी नव्हती. या वेळेत बालगोपालकडून सौरभ सालपे याने फ्री किकवर मारलेला चेंडू प्रॅक्टिसचा गोलरक्षक राजीव मिरीयाल याच्या हातात विसावला. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी केलेल्या चढायांचे रूपांतर गोलमध्ये होत नव्हते. त्यामुळे सामना रटाळवाण्या स्थितीत सुरू होता. या वेळी प्रॅक्टिसच्या माणिक पाटीलने चेंडू घेऊन बालगोपालच्या गोलजाळीकडे चाल केली. त्याने फटकाविलेला चेंडू बालगोपालच्या गोलजाळीच्या खांबाला तटून पुन्हा मैदानात परतला. याचवेळी गोलजाळीसमोर आलेल्या प्रॅक्टिसच्या राहुल पाटील याने चेंडूस ७६ व्या मिनिटास गोलजाळीत धाडले.  बालगोपालकडून बबलू नाईकने धोकादायक चढाई करत गोल करण्याचा प्रयत्न केला. गोलरक्षक राजीवने त्याला वेळीच रोखत कोणते संकट टाळले.

कामगार दिनानिमित्त एक मेपर्यंत सामने होणार नाहीत. दिलबहार तालीम मंडळ (अ) तर विरुद्ध पाटाकडील तालीम (अ) मंडळ यांच्यात दोन मेस दुपारी चार वाजता सामना होईल.

Web Title: practice football club reached the final round

टॅग्स

संबंधित बातम्या

amazon-more
दिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)

भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...

लोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन

पुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे  (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...

muktapeeth
नेपाळची सायकलसफर

तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...

amit shah
शहरी नक्षलवाद्यांचे राहुल समर्थन करताहेत: अमित शहा

रायपूर (छत्तीसगड): "पंतप्रधानांच्या हत्येचा कट करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी समर्थन करत आहेत. त्यांनी जनतेसमोर भूमिका...

लाखोंच्या उत्साहात कडेगावमध्ये गगनचुंबी ताबुतांच्या भेटी 

कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व...