Sections

मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
Farmers of Vidarbha movement at Pandharpur

पंढरपूर - राज्यभरात विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात फडणवीस सरकारच्या विरोधात विठ्ठल दरबारी आंदोलन केले. यावेळी, बा विठ्ठला, या फडणवीस सरकारला शेतकरी हिताची सुबुद्धी दे! असे साकडेही शेतकरी व गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातले. 

पंढरपूर - राज्यभरात विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात फडणवीस सरकारच्या विरोधात विठ्ठल दरबारी आंदोलन केले. यावेळी, बा विठ्ठला, या फडणवीस सरकारला शेतकरी हिताची सुबुद्धी दे! असे साकडेही शेतकरी व गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातले. 

राष्ट्रवादीने पुन्हा सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधी भावना तयार होऊ लागली आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व आले आहे. विविध मागण्या घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात येऊन धडकले. विदर्भातून आलेल्या शेतकरी आणि महिलांनी सकाळी नामदेव पायरीजवळ काही वेळ थांबून सरकारविरोधी घोषणा देत भाजप सरकारबद्दलचा रोष व्यक्त केला. त्यानंतर महाद्वार ते शिवाजी चौकापर्यंत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात मोर्चा काढून शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली. यावेळी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष संदीप भोयर यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

- शेतीमालाला हमीभाव मिळावा  - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी  - कापसावरील बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी  - शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे 

Web Title: pandharpur news Farmers of Vidarbha movement at Pandharpur

टॅग्स

संबंधित बातम्या

kalamb
भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा कळंब तहसीलवर मोर्चा

कळंब : भारतीय जनता पक्षाच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ बॅंकेने (परळी, जि. बीड) अत्यंत कमी किमतीत हावरगाव (ता....

jail
नांदेड : चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद  

नांदेड : रेल्वेत प्रवाशांच्या नजरा चुकवून त्यांच्या किंमती साामानाची चोरी करणारी महिलांची टोळी लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा परिसरातून 14 ...

जत तालुक्यातील खलाटी गावात गांजा शेतीवर कारवाई

सांगली - जत तालुक्यातील खलाटी गावात गांजा शेतीवर पोलिसांनी कारवाई केली. यात 1 लाख 51 हजाराचा गांजा जप्त केला. याबाबत मिळालेली...

माने दांपत्याने सुरू केलेला गांडूळखतनिर्मिती व्यवसाय.
एकमेकांच्या साथीनेच जिद्दीने फुलवली एकात्‍मिक शेती

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ. अर्चना व गोकूळ या माने दांपत्याची केवळ साडेतीन एकरांपर्यंतच शेती आहे. पण एकमेकांना समर्थ साथ देत,...

मागूनही मिळेना विहीर...

सोलापूर : मागेल त्याला शेततळे या योजनेच्या धर्तीवर मागेल त्याला विहिर योजना राज्यात राबविली जात आहे. परंतु, दरवर्षी साडेचार हजार विहिरींचे...