Sections

साताऱ्यात लवकरच मल्टिप्लेक्‍स

शैलेन्द्र पाटील |   बुधवार, 4 एप्रिल 2018
satara-7multiplex

सातारा - चांगली चित्रपटगृहे नाहीत, या सबबीखाली चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांकडे पाठ केली, अशी वदंता आहे. या चित्रपट रसिकांसाठी एक शूभवार्ता आहे. साताऱ्यात ‘पाच स्क्रीन’च्या मल्टिप्लेक्‍सच्या कामाने वेग घेतला असून, येत्या जूनमध्ये ते सातारकर रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृहे बंद होत असताना मुख्य बस स्थानकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी  एकाच इमारतीत, एकाच वेळी पाच चित्रपटांचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने चित्रपटरसिकांना दिलासा देणारी बाब ठरली आहे. 

सातारा - चांगली चित्रपटगृहे नाहीत, या सबबीखाली चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांकडे पाठ केली, अशी वदंता आहे. या चित्रपट रसिकांसाठी एक शूभवार्ता आहे. साताऱ्यात ‘पाच स्क्रीन’च्या मल्टिप्लेक्‍सच्या कामाने वेग घेतला असून, येत्या जूनमध्ये ते सातारकर रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृहे बंद होत असताना मुख्य बस स्थानकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी  एकाच इमारतीत, एकाच वेळी पाच चित्रपटांचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने चित्रपटरसिकांना दिलासा देणारी बाब ठरली आहे. 

जयविजय, राधिका पाठोपाठ ‘समर्थ’ हे सहावे चित्रपटगृह बंद पडल्याने साताऱ्यात ‘राजलक्ष्मी’ हे एकमेव चित्रपटगृह राहिले आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृह बंद पडण्याची मालिका गेल्या काही वर्षांत साताऱ्यात सुरू असताना चित्रपट रसिकांना दिलासा देणारी एक बातमी येऊन ‘सकाळ’ कार्यालयात थडकली आहे. जिल्ह्यातील पहिलंवहिलं मल्टिप्लेक्‍स साताऱ्यात साकारत आहे. टुरिंग टॉकीजबरोबरच गावोगावी निमित्ताने पडद्यावर दाखवले जाणारे चित्रपट, सुसज्ज चित्रपटगृहे आणि आता बहुपर्यायी रूपेरी पडद्यांच्या ‘मल्टिप्लेक्‍स’च्या दिशेने चित्रपटांचा प्रवास सुरू राहणार आहे. 

राज्य मार्ग परिवहन विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयापुढे ‘सेव्हन स्टार’ हे बहुउद्देशीय संकुल आर्किटेक्‍ट महेंद्र चव्हाण यांनी विकसित केले आहे. याच इमारतीत हे मल्टिप्लेक्‍स आहे. ‘एस टीव्ही’ या कंपनीची गुजरातपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये सुमारे ३०० स्क्रीन चालविली जातात. हीच कंपनी ‘सेव्हन स्टार’ मल्टिप्लेक्‍सचे व्यवस्थापन पाहणार आहे. 

या मल्टिप्लेक्‍सबाबत ‘सकाळ’शी बोलताना महेंद्र चव्हाण यांनी सांगितले, ‘२९० आसन क्षमता असलेली तीन व शंभर आणि ७० आसन क्षमतेची प्रत्येकी एक अशी पाच चित्रटगृहे त्यामध्ये असतील. एकाच ठिकाणी पाच चित्रपटांचा पर्याय प्रेक्षकांपुढे असणार आहे. त्यामुळे रसिकांना निवडीला वाव आहे. ७० प्रेक्षक बसतील अशा चित्रपटगृहात आरामशीर, तिरकं झोपून सिनेमा पाहता येईल, अशी आसनांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. १०० आसन क्षमतेच्या चित्रपटगृहात खुर्च्यांऐवजी बसण्यासाठी ऐसपैस सोफे असणार आहेत. २९० आसन क्षमतेची उर्वरित तीन स्क्रीन आरामशीर खुर्च्यांची असतील.’’

ही पाचही चित्रपटगृहे वातानुकूलित असतील. चित्रपटरसिकांना एक चांगल्या दर्जाची मनोरंजनाची सोय उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. जूनमध्ये सेव्हनस्टार मल्टिप्लेक्‍स सातारकरांच्या सेवेत रुजू होईल.- महेंद्र चव्हाण, विकसक, सेव्हन स्टार मल्टिप्लेक्‍स.

Web Title: Multiplexes soon in Satara

टॅग्स

संबंधित बातम्या

खान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड !

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात  बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...

Movie
विद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव

पिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...

pune
शॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग

सहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...

Mahatma-Phule-Movie
ओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती

नाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...

Superhero superhero! (Forward)
सुपरहिरोंचा सुपरबाप! (अग्रलेख)

बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...

आलोक नाथ यांची "सिन्टा'तून उचलबांगडी 

मुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...