Sections

आमदार जगताप यांच्या कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 17 एप्रिल 2018
Sangram-Jagtap

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवस वाढ झाली; तर अन्य दोन आरोपींना न्यायालयाने तीन दिवस (ता. 19 पर्यंत) पोलिस कोठडी दिली.

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवस वाढ झाली; तर अन्य दोन आरोपींना न्यायालयाने तीन दिवस (ता. 19 पर्यंत) पोलिस कोठडी दिली.

केडगाव येथे दहा दिवसांपूर्वी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुख्य आरोपी संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, बी. एम. ऊर्फ भानुदास कोतकर, आमदार संग्राम जगताप, बाबासाहेब केदार यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, 'मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्या कबुलीवरून दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. त्यावरून आरोपी संदीप गिऱ्हे, महावीर मोकळे यांना अटक केली असून, 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हत्याकांडाचा मुख्य आरोपी विशाल कोतकर फरार असून, त्याला अटक करावयाची आहे. त्याला अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घ्यावयाचा आहे.''

आरोपींतर्फे बाजू मांडताना ऍड. महेश तवले म्हणाले, ""फिर्याद खोटी असून, चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. आमदार संग्राम जगताप यांना आतापर्यंत नऊ दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तपासात अद्यापपर्यंत त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला नाही.''

विशाल कोतकरचा शोध सुरू केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास सध्या मुख्य सूत्रधार विशाल कोतकर याच्याभोवती फिरत आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. विशाल कोतकर आणि मुख्य आरोपी संदीप गुंजाळ यांच्या संवादाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यापूर्वी विशाल कोतकर याच्याबरोबर कोणी संवाद साधला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: mla sangram jagtap custody increase

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित...

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा...

abab bagul
कुसंगतीने भरकटलेल्या तरुणाईला मिळणार दिशा 

पुणे : मजेखातर अथवा 'थ्रिल' म्हणून अजाणत्या वयात काही मुले-मुली पोलिस स्टेशनची पायरी चढतात. पोलिस दफ्तरी गुन्हे दाखल झालेल्या १५ ते २५ वयोगटातील तरुण...