Sections

एमएस-सीआयटी आता देणार जॉब रेडीनेस!

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 23 मार्च 2018
MKCL has made changes in MS-CIT curriculum

काळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 
 

सोलापूर - आधुनिक युगात संगणक प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असून भविष्याचा वेध घेऊन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलने एमएस-सीआयटीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. काळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रत्येक नागरिकाला संगणकाची ओळख व्हावी या उद्देशाने एमकेसीएलने एमएस-सीआयटी या शासनमान्य अभ्यासक्रमाची सुरवात केली होती. बदलत्या काळानुरूप या अभ्यासक्रमात बदल करून आयटी साक्षरतेचे नऊ स्तंभ दिले आहेत. ज्यात आता महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, प्रोफेशन आणि व्यावसायिक लोकांना जॉब रेडी होण्यासाठी कौशल्य प्राप्त होणार आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा पदवी शिक्षण अभ्यासक्रमही सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना शिकताना नोकरीचा अनुभवही घेता येणार आहे. याबरोबरच इतरही नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. तसेच इंग्रजी संवाद कौशल्ये व मृदु कौशल्ये या विषयांचे प्रशिक्षण देणारा नवीन क्‍लिक इंग्लिश हा कोर्स सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच व्यावहारिक क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी, त्यांना जॉब रेडी करण्यासाठी एमकेसीएलने विविध अभ्यासक्रमांची रचना केल्याचे श्री. पत्रिके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस एमकेसीएलचे जिल्हा व्यवस्थापक रोहित जेऊरकर, प्रताप भोसले, हारुण शेख, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.  

हे सर्व कोर्स कौशल्यावर अधारीत असून 3 महिने कालावधी आहे. सोलापूर जिल्ह्यात 135 सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत रोज तास तास हे प्रशिक्षण असेल. सर्वच अभ्यासक्रमांची फि तीन हजार आठशे रुपये आहे. अभ्यासक्रमांमधून सायबर सुरक्षेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.

Web Title: MKCL has made changes in MS-CIT curriculum

टॅग्स

संबंधित बातम्या

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...

Sharad Pawars Solve Wrestling between two Marathi channels
शरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'

पुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...

केसरकर यांचा जिल्ह्यात वचक : सावंत

सावंतवाडी : माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या काळात गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय हत्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या...

solapur
सोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन 

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...