Sections

जिल्ह्यातील 150 गावांत भासणार टंचाई 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सातारा - यंदा पाऊसमान चांगले झाले असल्याने जलयुक्‍त शिवार अभियानातील, तसेच जलसंधारणाची कामे झालेल्या गावांत जलसाठे वाढले आहेत. परिणामी, फेब्रुवारी महिना संपत आला तरी अवघा एकच टॅंकर सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने जूनअखेरचा आठ कोटी खर्चाचा टंचाई कृती आराखडा बनविला आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे 145 गावे व 68 वाड्या-वस्त्यांवर टंचाई भासण्याचा अंदाज बांधला आहे. 

सातारा - यंदा पाऊसमान चांगले झाले असल्याने जलयुक्‍त शिवार अभियानातील, तसेच जलसंधारणाची कामे झालेल्या गावांत जलसाठे वाढले आहेत. परिणामी, फेब्रुवारी महिना संपत आला तरी अवघा एकच टॅंकर सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने जूनअखेरचा आठ कोटी खर्चाचा टंचाई कृती आराखडा बनविला आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे 145 गावे व 68 वाड्या-वस्त्यांवर टंचाई भासण्याचा अंदाज बांधला आहे. 

सातारा जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती विरोधाभासाची असून, पश्‍चिमेकडे भरपूर पर्जन्य, तर पूर्वेकडे दुष्काळी स्थिती असते. माण, खटाव, उत्तर कोरेगाव या तालुक्‍यांत प्रामुख्याने दुष्काळाची तीव्रता जास्त असते. फलटण, खंडाळा तालुक्‍यांमध्ये विविध धरणांचे कालव्यांद्वारे पाणी पोचले असल्याने तेथील काही भागांत दुष्काळी समस्या कमी होत आहे. कऱ्हाडच्या उत्तर भागात मात्र दुष्काळी गावे वाढत आहेत. पाटण, महाबळेश्‍वर, वाईमध्येही पाण्याचे झरे आटत असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. 

त्या पार्श्‍वभूमीवर टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने आठ कोटी 17 लाखांचा आराखडा बनविला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ऑक्‍टोबर ते जूनअखेर जिल्ह्यातील 145 गावे व 68 वाड्या-वस्त्यांवर टंचाई भासू शकते. दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 325 टॅंकरची आवश्‍यकता लागण्याचा अंदाज आहे. गतवर्षी 135 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गत पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्याने यावर्षी सुमारे 70 ते 100 टॅंकरची आवश्‍यकता भासेल. सध्या आवळेपठार (गारवडी, ता. खटाव) येथे एकच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

दरम्यान, गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने पाणीटंचाई कमी भासण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्‍त केली जात आहे. जिल्ह्याची सरासरी 918.9 असून, गतवर्षी एक हजार 182 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दुष्काळी माणमध्ये सरासरीपेक्षा 42.8, खटावमध्ये 240 मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. मात्र, कोरेगाव व पाटणमध्ये अनुक्रमे 170 व 465 मिलिमीटर इतका सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 

गतवर्षीचा तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः सातारा- 957, जावळी- 1617, पाटण- 1267, कऱ्हाड- 735, कोरेगाव- 472, खटाव- 654, माण- 485, फलटण- 538, खंडाळा- 584, वाई- 790, महाबळेश्‍वर- 4898. 

टंचाई आराखड्यातील प्रमुख तरतुदी (आकडे कोटीत)  नवीन विंधन विहिरी, कूपनलिका घेणे : 1.36  नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती : 1.14  तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना : 00.62  खासगी विहिरी अधिग्रहित करणे : 00.69  टॅंकरने पाणीपुरवठा : 2.59 

जिल्ह्यात गतवर्षी पाऊसमान चांगले झाले आहे. जलयुक्‍त शिवार अभियान, लोकसहभागातून झालेल्या जलसंवर्धनाच्या कामांमुळे जलसाठे वाढलेत. त्यामुळे यावर्षी टंचाईची तीव्रता कमी भासेल. टॅंकरची संख्याही 100 पेक्षा कमी लागेल. - संजय पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो)

Web Title: marathi news water shortage satara

टॅग्स

संबंधित बातम्या

Onion
४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये

वडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...

letter
माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'

सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...

थिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक

शिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात...

dhing tang
उठाव! (ढिंग टांग)

पहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...

sugarcane workers
घराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय? 

उमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय? पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...

003Court_Decision_h_8_0_3.jpg
मिलिंद एकबोटेंवरील जामीनाच्या अटी शिथिल 

पुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी...