Sections

टोमॅटोचे भाव गडगडल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल 

हरिभाऊ दिघे |   मंगळवार, 13 मार्च 2018
talegaon nagar tomato

तळेगाव दिघे ( नगर ) - संगमनेर तालुक्यात उत्पादन वाढल्याने टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल बनले आहेत. गावोगावी जावून शेतकरी आता टोमॅटो विकू लागले आहेत. स्वस्त भावात मिळत असल्याने अनेक शेतकरी जनावरांना चारा म्हणून टोमॅटो खावू घालत आहेत.

तळेगाव दिघे ( नगर ) - संगमनेर तालुक्यात उत्पादन वाढल्याने टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल बनले आहेत. गावोगावी जावून शेतकरी आता टोमॅटो विकू लागले आहेत. स्वस्त भावात मिळत असल्याने अनेक शेतकरी जनावरांना चारा म्हणून टोमॅटो खावू घालत आहेत.

 टोमॅटो दर कोसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो बाजारात नेणे तोट्याचे बनले आहे. त्यामुळे सध्या आपल्या शेतकरी बांधवांनाच अल्प भावात टोमॅटो विकण्यास प्राधान्य देत आहेत. सावरगावतळ ( ता. संगमनेर ) येथील गोरक्षनाथ थिटमे, भाऊसाहेब गाढे, सोमनाथ नेहे, बाबासाहेब थिटमे या शेतकऱ्यांनी सोमवारी पिकअपमधून चिंचोलीगुरव येथे टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. जनावरांना चारा म्हणुन तज्ञांच्या सल्ल्याने टोमॅटो वापरले जावू शकतात. प्रकाश गोडगे, जगन्नाथ सोनवणे, वाल्मिक गोडगे, संजय सोनवणे, दगडु सोनवणे, तुकाराम सोनवणे, बाळासाहेब शेटे या शेतकऱ्यांनी जनावरांसाठी अल्पदरात टोमॅटो खरेदी केले.

 संगमनेर तालुक्यात यंदा टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र बाजारात टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याने टोमॅटो कवडीमोल भावात विकण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली. पठार भागातील तसेच पाश्चिम भागातील शेतकऱ्यांनी हिवाळ्यात यावर्षी मल्चिंगचा वापर करून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली होती. त्यासाठी खते व औषधे यावर मोठा खर्च करावा केला. मात्र उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

टोमॅटो खरेदीचे आवाहन  बाजारात टोमॅटोला ४० ते ५० रुपये प्रति जाळी ( २० किलो ) असा बाजारभाव मिळत आहे. खर्च ३० ते ४० रुपये येत असल्याने शेतकऱ्याला जाळीमागे १० ते २० रुपये शिल्लक राहत नसल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल बनले आहेत. जनावरांसाठी चारा म्हणून शेतकरी बांधवांनी जनावरांसाठी चारा म्हणून टोमॅटो खरेदी करावेत, असे आवाहन राजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.

Web Title: marathi news tomato farmer sangamner

टॅग्स

संबंधित बातम्या

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

दुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू

करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...

बीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल

बीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....

solapur
सोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन 

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...

Shahid kapoor
जुहू चौपाटीवर 200 जवानांसह शाहिद कपूरची स्वच्छता मोहिम

मुंबई : 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 24 ला जुहू चौपाटीवर पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत...