Sections

कऱ्हाड: नांदलापूर येथील खाणीमध्ये अवैध उत्खनन सुरू

सचिन शिंदे |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
stone mining

खाण माफीयांचाच दबाव
सहा महिन्याच्या मुदतीने अकरा खाणींना परवानगी होती. त्या खाणींची मुदत संपल्याचे संबधितांना कळवण्यात आले होते. तोंडी व लेखीही सुचना दिल्या होत्या. त्या सगळ्या नोटीसांना त्यांनी केराची टोपली दाखवली होती. राजकीय वरदहस्त असल्याने खाण माफीयांनी त्यांचे उत्खनन चालू ठेवले होते. त्या खाण माफीयांचा राजकीय वट मोठा आहे, तोच राजकीय दबाव आणून महसूल यंत्रणाही गप केली होती. त्यामुळेच मुदत संपूनही त्यांचे उत्खनन सुरू होते. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर त्यावर कारवाई झाली. त्यामुळे आता त्या खामी कायमस्वरूपी बंद व्हाव्यात, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

कऱ्हाड : मुदत संपली आहे, उत्खनन बंद करा, अशा लेखी व तोंडी सुचना तहसीलदार कार्यालयाकडून वारंवार देवूनही त्याला न जुमानता किमान सहा महिन्यांपासून नांदलापूर येथील खाणीमध्ये अवैध उत्खनन सुरू होते.

ऐतिहासिक वारसा असलेला डोंगरात खाण माफीयांनी उत्खनन करून पोखरून काढला. राजकीय वरदहस्त असलेले उत्खनन माफीयांनी राजकीय दबाव आणत येथील शासकीय यंत्रणेलाही धाकात ठेवले होते. मोठ्या राजकीय वरदहस्ताने सुरू असलेले अवैध उत्खनन करणाऱ्या सुमारे अकरापेक्षा जास्त खाणी काल सील करण्यात आल्या. अत्यंत धाडसी पाऊल उचलत महसूल खात्याने कारवाई केली. मात्र मुदत संपूनही जेवढ्या कालावधीत अवैध उत्खनन झाले. त्याला जबाबदार कोण, त्या काळातील अवैध उत्खननावर शासकीय पातळीवर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.

नांदलापूर येथे कारवाई झाली. त्यात अकरा खाणींवर कारवाई करण्यात आली. त्या खाणींना सहा महिन्यासाठी उत्खनन परवाना मिळाला होता. मात्र परवाना संपूनही त्यांनी उत्खनन चालू ठेवले होते. त्यामुळे त्यांचे ते उत्खनन बंद पाडले. तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली काल दिवसभर कारवाई सुरू होती. संबधीत खाणींची मुदत संपून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला होता. त्यामुळे त्या सील करण्यात आले. त्यात विलास शिर्के, धोडिराम जाधव, मनोजकुमार जाधव, राजाराम कदम, सचिन शिर्के, पांडूरंग देशमुख, वसंत देशमुख, सतीश थोरात, अशोक जाधव यांच्या प्रत्येकी तर दत्तात्रय देसाई यांच्या दोन खाणींचा समावेश आहे. राजकीय वरदहस्त मोठा असल्याने खाण माफीयांनी राजकीय यंत्रणेलाच वेठीस धरून उत्खनन चालू ठेवल्याची वस्तूस्थिती समोर येवू लागली आहे. राजकीय दबाव आणून सुरू असलेले उत्खनन तहसीलदारांनी बंद केले मात्र त्या संबधित खाण माफीयांचे परवान्यांची मुदत होती फक्त सहा महिन्यांची. त्यानंतर त्यांनी मुदत संपूनही किती दिवस उत्खनन चालू ठवले, याची तांत्रिक माहिती घेवून उत्खनन मुंदत संपून जिकते दिवस अधिक त्यांनी उत्खनन केले आहे. त्या कालवधीत त्या खाण माफीयांकडून प्रत्येक दिवसाचा दंड  घेण्याची मागणी होत आहे. 

वास्तविक एतिहासिक पार्श्वभुमी असलेल्या आगाशिव डोंगराला लागूनच होणारे उत्खनन त्या गडाला अत्यंत धोकादायक आहे. तेथे असलेल्या बौध्द कालीन लेण्यांनाही त्याचा धोका आहे. त्याबाबत मिराताई आंबेडकर यांनाही वारंवार आंदोलनाचा इशारा दिला आहे. तेवढ्यापूर्ते तेथे बंदी आणली जाते. पुन्हा खाण माफीयांकडून राजकीय दबाव आणून त्या परवानग्या घेतली जाते व पुन्हा उत्खननाचा खेळ सुरू होतो. उत्खनन करण्यासाठी लोक त्या गडावर सुरूंग लावताता. भल्या पहाटे किंवा सकाळी सातच्या सुमारास तो सुरूंग लावला जातो. त्या सुरूंगाने त्या भागातील डोंगर कपारी तर हादरून जातेच, त्याशिवाय त्या भागातील वन्य प्राणी व पक्षांवरही त्याचा परिणाम होताना दिसतो आहे. तेथील नागरीकांनाही त्या सुरूगांचा त्रास सहन करावा लागतो आहे. उत्खनन करणारे या कोणाचीही परवा न करता त्यांचे काम सुरू करतात, यावरही नियंत्रण येण्याची गरज आहे. नांदलापूर येथे १७ दगडाच्या खाणी आहेत. त्यातील ११ दगडाच्या खाणींना उत्खननासाठी सहा महिन्याची  मुदत होती. या खाणींची मुदत केंव्हा संपली होती. ती त्यांनी रिन्यूव्ह का केली नाही, कोणाच्या वरदहस्ताने त्या खाणीतून उत्खनन सुरू होते, या सगळ्याच गोष्टीची खुलासेवार चौकसी होवून तेथील खाणींचे उत्खनन कायमस्वरूपी बंद व्हावे, यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

खाण माफीयांचाच दबाव सहा महिन्याच्या मुदतीने अकरा खाणींना परवानगी होती. त्या खाणींची मुदत संपल्याचे संबधितांना कळवण्यात आले होते. तोंडी व लेखीही सुचना दिल्या होत्या. त्या सगळ्या नोटीसांना त्यांनी केराची टोपली दाखवली होती. राजकीय वरदहस्त असल्याने खाण माफीयांनी त्यांचे उत्खनन चालू ठेवले होते. त्या खाण माफीयांचा राजकीय वट मोठा आहे, तोच राजकीय दबाव आणून महसूल यंत्रणाही गप केली होती. त्यामुळेच मुदत संपूनही त्यांचे उत्खनन सुरू होते. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर त्यावर कारवाई झाली. त्यामुळे आता त्या खामी कायमस्वरूपी बंद व्हाव्यात, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

Web Title: Marathi news Satara news stone mining

टॅग्स

संबंधित बातम्या

बिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई

तिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग...

खंडाळ्यातील लिपिक लाच घेताना जाळ्यात 

खंडाळा - जमीनवरील "32 ग' ची नोंद रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक...

दोन हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात

बांबवडे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळशी सज्जात कार्यरत असणारा तलाठी निवास साठे यास दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ...

The clerk in Tahsildars office of Khandala was arrested for taking a bribe
खंडाळा : तहसीलदार कार्यालयातील लिपीकाला लाच घेताना अटक

खंडाळा : जमिनीवरील 32 ग ची नोंद रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना येथील तहसीलदार कार्यालयातील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक...

परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीय महिलांचे आंदोलन

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीत सुरू करावे या मागणीसाठी उभारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (ता. २१ ) ...