Sections

छोट्या आस्थापनांचे बॅंक करंट अकाउंट बंद

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 16 मार्च 2018

शासनाने तोडगा काढण्याची मागणी
छोट्या आस्थापनांच्या करंट खात्यातील रकमेचा सध्या काही उपायोग करता येत नाही. त्यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर शासनाने बॅंकांना सूचना देऊन तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

सातारा - दहाच्या आत कामगारसंख्या असलेल्या आस्थापनांना शासनाच्या अध्यादेशामुळे शॉप ॲक्‍ट लायसन्स मिळत नसल्याने संबंधित व्यावसायिकांचे करंट खात्यातील व्यवहार बॅंकांनी थांबवले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. याबाबत शासकीय पातळीवर तातडीने निर्णय होणे आवश्‍यक आहे.

एक कामगार असला तरी, पूर्वी संबंधित व्यवसायासाठी शॉप ॲक्‍टचे लायसन्स दिले जात होते. मात्र, शासनाच्या नव्या अध्यादेशामुळे एक ते नऊ कामगारसंख्या असणाऱ्या व्यावसायिकांना ‘ग’ फॉर्म व सूचनापत्र दिले जाते. त्यामुळे शॉप ॲक्‍ट लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणे प्रमाणपत्र मिळाले नाही. कामगार कल्याण कार्यालयातून त्यांचा ‘ग’ नमुन्याचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आला. त्याचीच प्रत त्यांना परत देण्यात आली. 

बहुतांश व्यावसायिकांचे बॅंकेमध्ये करंट अकाउंट आहे. त्यावरच त्यांचे दैनंदिन व्यवहार चालतात. करंट खाते काढण्यासाठी व चालविण्यासाठी शॉप ॲक्‍टच्या लायसन्सची प्रत बॅंकेकडून घेतली जाते. त्यानंतर संबंधित खात्यावर व्यवहार सुरू केले जातात. नव्या नियमामुळे लायसन्सच्या प्रतीऐवजी ‘ग’ नमुन्याची प्रत दिली गेली आहे. ती प्रत व्यावसायिकांनी बॅंकेकडे जमा केली आहे. मात्र, त्यांना पूर्वीप्रमाणे शॉप ॲक्‍टच्या प्रमाणपत्राची मागणी बॅंकेकडून केली जात आहे. तोपर्यंत संबंधितांच्या करंट खात्यावर रक्कम जमा करून घेतली जात आहे. मात्र, पैसे काढून दिले जात नाहीत.

पैसे काढायचे असल्यास शॉप ॲक्‍टचे लायसन्स आणा, असे बॅंकेकडून सांगितले जात आहे. मात्र, संबंधित कार्यालयाकडून शासनाच्या अध्यादेशाचा हवाला देत केवळ ‘ग’ नमुना दिला जात आहे. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्‍न व्यावसायिकांसमोर उपस्थित झाला आहे.

करंट खात्यावर पैसे काढून दिले जात नसल्याने व्यावसायिकांना आपली देणी भागवता येत नाहीत किंवा एखाद्याकडून काही वस्तू घेण्यासाठी त्याला करंट खात्याचा धनादेशही देता येत नाही. त्यामुळे त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

Web Title: marathi news satara news bank current account close shop act license

टॅग्स

संबंधित बातम्या

Sanika Thugavkar and Rohit
अडीच महिन्यांनी सानिकाला मृत्यूने गाठले

नागपूर - मैत्रीसंबंध कायम ठेवण्यासाठी नकार दिल्यामुळे मित्राने चाकूने भोसकलेल्या सानिका प्रदीप थुगावकरचा (वय २१, रा. आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर) गेल्या...

Human-Trafficking
जन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला!

नागपूर - बेडिया, कंजर, नट बेडिया जमातीत कुठल्याही घरात मुलीचा जन्म झाला, तर उत्सव साजरा केला जातो. जन्माला आलेली मुलगी बारा-चौदा वर्षांची झाली की,...

Ganesh festival : मेरे मालिक, मेरे मौला.. बाप्पा मोरया!

बेळगाव - बेळगाव शहराला मोठी परंपरा असून शहरात धार्मिक सलोख्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. शहराला लागून असलेल्या काही गावांमध्येही हिंदू-...

Grocery
रिटेल व्यवसायात ॲमेझॉनच्या प्रवेशामुळे किराणा युद्ध भडकणार

मुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात...

देशात किराणा युद्ध भडकणार 

मुंबई - "वॉलमार्ट'पाठोपाठ "ई-कॉमर्स'मधील महाकाय कंपनी असलेलल्या "ऍमेझॉन'ने आदित्य बिर्ला समूहाचे "मोअर' सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा...