Sections

परदेशींची आता माउंट एव्हरेस्ट मोहीम! 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Mount Everest campaign satara

सातारा - नेपाळमधील माउंट आयलॅंड या सहा हजार 163 मीटर शिखरावर भारताचा झेंडा फडकविल्यानंतर लोणंद येथील गिर्यारोहक प्रजित परदेशी आता माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणार आहे. सुमारे 71 दिवसांच्या या खडतर मोहिमेस 20 मार्चला ते प्रारंभ करणार आहेत. 

सातारा - नेपाळमधील माउंट आयलॅंड या सहा हजार 163 मीटर शिखरावर भारताचा झेंडा फडकविल्यानंतर लोणंद येथील गिर्यारोहक प्रजित परदेशी आता माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणार आहे. सुमारे 71 दिवसांच्या या खडतर मोहिमेस 20 मार्चला ते प्रारंभ करणार आहेत. 

यापूर्वी प्रजित परदेशी यांनी 58 तासांत आळंदी ते पंढरपूर पायीवारी, तसेच 407 किलोमीटरचे अष्टविनायकाचे अंतर 104 तासांत पूर्ण केले आहे. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. गिर्यारोहणाची आवड असलेल्या प्रजित हे सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी नेपाळमधील माउंट आयलॅंड या सहा हजार 163 मीटरचे शिखरावर देशाचा झेंडा फडकविला. माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी प्रजित यांचा माउंट बेसिक कोर्सही पूर्ण झाला आहे. जिद्द व चिकाटीबरोबरच एक वर्ष कठोर परिश्रम घेत असलेले प्रजितवर सातारा जिल्ह्यातूनच नव्हे, तर देशातील संपूर्ण भाजप कार्यकर्त्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी शुभेच्छा देत नुकताच त्यांना ध्वज प्रदान केला. 

प्रजित हा उत्तम उदयोन्मुख गिर्यारोहक आहेत. लोणंदसारख्या छोट्या गावातील असतानाही ते साहसी क्रीडा प्रकाराकडे वळले याचे कौतुक आहे. माउंट एव्हरेस्ट मोहिमेच्या यशस्वितेसाठी ते परिश्रम घेत आहेत. - उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक व मार्गदर्शक

Web Title: marathi news satara Mount Everest campaign

टॅग्स

संबंधित बातम्या

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

ulhasnagar
उल्हासनगरात महापौरच्या निवडणुकीला धक्कादायक कलाटणी

उल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने...

Cabinet reshuffle in Goa in absence of Chief Minister parrikar
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना

पणजी- गोवा मंत्रिमंडळातून आज नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडूुरंग मडकईकर यांना डच्चू देण्यात आला. डिसोझा सध्या न्यूयॉर्क येथे उपचार...

काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!
काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या...

police
आता भाजपला नारळ देणार; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

पुणे : डीजेला बंदी असल्याचा राग अनेक मंडळांना अनावर झाला आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  गणपती विसर्जन...