Sections

नवीन बांधकामांसाठी क्षारयुक्त वाळूचा वापर 

विलास माने  |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
salty sand

मल्हारपेठ - जिल्ह्यात वाळू उपशावर बंदी आल्याने व्यावसायिकांनी आता कोकणातील क्षारयुक्त वाळूवर लक्ष केंद्रित केले आहे. क्षारयुक्त असूनही कोकणातील ही महागडी वाळू बांधकामांसाठी वापरली जात आहे. त्यातून बांधकामांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्याशिवाय क्षारयुक्त वाळूमुळे जादा सिमेंट वापरावे लागत असल्याने बांधकाम करणारांचे आर्थिक बजेटही कोलमडताना दिसते. 

मल्हारपेठ - जिल्ह्यात वाळू उपशावर बंदी आल्याने व्यावसायिकांनी आता कोकणातील क्षारयुक्त वाळूवर लक्ष केंद्रित केले आहे. क्षारयुक्त असूनही कोकणातील ही महागडी वाळू बांधकामांसाठी वापरली जात आहे. त्यातून बांधकामांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्याशिवाय क्षारयुक्त वाळूमुळे जादा सिमेंट वापरावे लागत असल्याने बांधकाम करणारांचे आर्थिक बजेटही कोलमडताना दिसते. 

जिल्ह्यात वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या वाळूउपसा बंद आहे. चोरून वाळूचा उपसा, वाहतूक व विक्री होत असली तरीही त्याचे प्रमाण अल्प असल्याने सध्या बांधकामांसाठी वाळू कमी पडत आहे. वाळूउपसा बंदीमुळे बांधकाम आणि वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. काहीच दिवसांपूर्वी ठिकठिकाणी गावोगावच्या ओढ्यातील वाळूउपशा करण्यात आला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यावर सर्वत्र कारवाई झाली. अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर "मोका' लावण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसताच चोरटा वाळूउपसा काही प्रमाणात थांबलेला दिसतो. 

क्षारयुक्त वाळूचे दरही गगनाला  बांधकाम व्यावसायिकांना लागणारी वाळू व मागणीचा विचार करून जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक आता कोकणातील समुद्राच्या वाळूकडे वळाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातून मोठ्या प्रमाणात वाळू या भागात आणली गेली आहे. त्या वाळूचा एका ब्रासचा दर आठ ते नऊ हजार रुपये आहे. एका गाडीचा दर जवळपास 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत जातो. सातारा, महाबळेश्वर, कऱ्हाड, वाई तालुक्‍यांत पाटणमार्गे वाळू वाहतूक होत आहे. शासन स्थानिक वाळू उपशावर बंदी घालत असल्यामुळे गावोगावच्या जनतेतून शासनाच्या विरोधात असंतोष आहे. 

बांधकामांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न  क्षारयुक्त वाळू बांधकामाला वापरणे धोक्‍याचे आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कामांना वाळू वापरली जात असेल तर त्याची गुणवत्ता  आणि दर्जाचे काय, असा प्रश्न आहे. समुद्राच्या क्षारयुक्त वाळूवर बांधकाम व्यावसायिक काम उरकत आहेत. क्षारयुक्त वाळू पाण्याने धुवून वापरा, असा जावई शोध काही ठिकाणी काढल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवली जात आहे. घरमालकही पर्याय नसल्याने अवाजवी दराने क्षारयुक्त वाळू घेताना दिसत आहेत. वाळूला पर्याय म्हणून ग्रीड, दगडी पावडरही पुढे येत आहे. त्याचा दर वाढला आहे. क्षारयुक्त वाळूच्या वापरामुळे बांधकामाला पोपडे सुटून बांधकाम ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. क्षारयुक्त वाळूच्या वापराने सिमेंटचे प्रमाण वाढवावे लागत आहे. त्यातून बांधकामाचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. 

गावोगावी घरकुलांची कामेही रखडली  प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले मंजूर झालेल्या गावांत वाळूच्या कमतरतेमुळे ही कामे रखडली आहेत. या स्थितीत घरकुलांसह अन्य शासकीय कामांसाठी समुद्रातील क्षारयुक्त वाळू वापरण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो. पण, ते गुणवत्तेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार झाला पाहिजे.

Web Title: marathi news new construction Use of salty sand

टॅग्स

संबंधित बातम्या

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...

BHIDE-PUL.jpg
बाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार?

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...

जुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी

जुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...

पुणे शहरात नीचांकी तापमान

पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...

समायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार 

मुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...

dhing tang
वनमंत्री वाचवा! (ढिंग टांग)

मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...