Sections

कॅन्सरशी सामना करत मिळवली पी. एचडी.

संभाजी थोरात, सचिन सावंत |   सोमवार, 19 मार्च 2018

कोल्हापूर -  कॅन्सरसारखा दुर्धर रोगाशी संघर्ष करुन उपचार घेतच पीएच डी मिळवण्याची किमया कोल्हापूर सकाळचे उपसंपादक प्रमोद फरांदे यांनी केली. आज शिवाजी विद्यापीठात त्यांचा गौरव करण्यात आला.

कोल्हापूर -  कॅन्सरसारखा दुर्धर रोगाशी संघर्ष करुन उपचार घेतच पीएच डी मिळवण्याची किमया कोल्हापूर सकाळचे उपसंपादक प्रमोद फरांदे यांनी केली. आज शिवाजी विद्यापीठात त्यांचा गौरव करण्यात आला.

सशक्त मन, सशक्त मेंदू आणि निरोगी शरीर सकारात्मकेची ऊर्जा तयार करते. या ऊर्जेतूनच अनेक शिखरे सर करण्यासाठी नवचेतना मिळते. याउलट रोगी शरीर आणि त्यातून मनाला आलेली मरगळ यशाच्या वाटेवर अडथळा आणतात. एखादा जर्जर आजार असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनात अंधकार पसरतो. हा अंधकार कधी कधी एखाद्याचा शेवट करतो. पण, दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि प्रबळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर एखाद्या आजारातून मुक्ती मिळविता येते, ही गोष्ट आज दुर्मिळच मानावी लागेल.

कॅन्सरचा आजार आणि त्याच्या वेदना सहन करीत पीएच.डी. तर मिळविलीच; पण सलग चार वर्षे कॅन्सरशी मैत्री करीत सकारात्मक विचारांतून कॅन्सरच्या धोक्‍यातून ते बाहेर पडले. जीवनाच्या अंधकारमय वाटेवर आनंद पेरणाऱ्या आणि ‘जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या’, अशा कृतीतून इतरांना  प्रेरणा देणाऱ्या एका आनंदयात्रीची ही कहाणी.

‘सकाळ’चे उपसंपादक प्रमोद श्रीरंग फरांदे असे त्यांचे नाव. प्रमोद सातारा जिल्ह्यातील आनेवाडीचे. घरात शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसल्याने अनेक टक्के टोणपे खात त्यांनी शिक्षण घेतले. पीएच.डी. करायची, हे ध्येय घेऊन ते कोल्हापुरात आले. पीएच.डी.ला प्रवेश मिळाला आणि दोन वर्षांतच त्यांना मधुमेह झाल्याचे निदान झाले. मधुमेहाशी मैत्री करेपर्यंत २०१४ मध्ये त्यांना पाइल्सचा त्रास सुरू झाला आणि त्यातून आजार बळावत गेला. काही दिवसांतच त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. हे समजताच प्रमोद यांची सारे काही संपले, अशी भावना निर्माण झाली. पण, कुटुंबाची जबाबदारी ओळखून काहीही झाले, तरी आपण बरे व्हायचे, असा निर्धार करीत त्यांनी डॉक्‍टरांची ट्रीटमेंट सुरू केली. स्वत:वर उपचार करीतच पीएच.डी.चे संशोधन प्रमोद यांनी केले. हे सर्व करताना वेगवेगळे त्रास होतेच, मात्र त्याचा बाऊ न करता त्यांनी संशोधनाचे काम पूर्ण केले.

नुकतीच त्यांना विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विषयातील पीएच.डी. मिळाली. ‘`दीनबंधू`तील नारायण मेघाजी लोखंडे यांची सामाजिक पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. अाज शिवाजी विद्यापीठात त्यांना पीएच डीची पदवी प्रदान करण्यात अाली. मोठ्या संघर्षातूनही यश मिळालेले प्रमोद यावेळी भावूक झाले होते.

प्रमोद फरांदे यांच्या संघर्षात त्यांच्या कुटूंबियांनी मोठी भूमिका बजावली अाहे. त्याची पत्नी भाग्यश्री फरांदे अाणि अाई- वडीलांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच ते उभे राहू शकले.

डाॅ. प्रमोद फरांदे यांच्या संघर्षातून अनेक जण प्रेरणा घेत अाहेत. कोणत्याही दुर्धर अाजारावर मात करत अापण उभ राहू शकतो हा अात्मविश्वास अनेकांच्यात निर्माण करण्यासाठी अाता डाॅ. फरांदे स्वतः लोकांशी संवाद साधत अाहेत.

Web Title: Kolhapur News Success story of Pramod Pharande

टॅग्स

संबंधित बातम्या

narendra modi
भाजपच्या हाती कोलित! (अग्रलेख)

मोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...

#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा! 

पुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....

File photo
परवाना आरायंत्राचा वापर "स्लायसर'चा

परवाना आरायंत्राचा वापर "स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...

पाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम

पुणे -  ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...

पाणीप्रश्‍नी प्रशासन धारेवर 

पुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......