Sections

गिजवणेत विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 6 मार्च 2018

गडहिंग्लज -  गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील एका तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोनाली आणाप्पा कापसे (वय १८) असे तिचे नाव आहे. ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. आज सायंकाळी एका विहिरीत तिचा मृतदेह सापडला. सोनाली गडहिंग्लजमधील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिने तीन पेपरही दिले होते. 

गडहिंग्लज -  गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील एका तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोनाली आणाप्पा कापसे (वय १८) असे तिचे नाव आहे. ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. आज सायंकाळी एका विहिरीत तिचा मृतदेह सापडला. सोनाली गडहिंग्लजमधील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिने तीन पेपरही दिले होते. 

१ मार्चला होळी साजरी करून सोनाली घरी गेली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ती घरातून निघून गेली. ती लवकर घरी न आल्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात झाली. परंतु ती आढळली नाही. दरम्यान, रविवारी (ता. ४) सोनाली बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. सायंकाळी रमेश पाटील यांच्या परसातील विहिरीजवळ त्यांच्याच घरातील मुले खेळत होती. पाण्यात कासव असल्याने ते पाहण्यासाठी मुले विहिरीकडे गेली, त्यावेळी त्यांना मृतदेह तरंगताना दिसला. त्याची कल्पना या मुलांनी श्री. पाटील यांच्या घरात दिली. या घटनेची बातमी गावात पसरताच विहिरीजवळ गर्दी झाली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो सोनालीचाच असल्याचे स्पष्ट झाले. आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. हवालदार श्री. नांगरे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Kolhapur News student suicide incident in Gijavane

टॅग्स

संबंधित बातम्या

गडहिंग्लज : देवदासींच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष बापू म्हेत्री. शेजारी दत्ता मगदूम, चंद्रकांत तेलवेकर, आप्पासाहेब नाईक, निलकंठ पट्टणशेट्टी आदी.
देवदासींचा 5 ऑक्‍टोबर रोजी गडहिंग्लज ते कोल्हापूरपर्यंत लॉंगमार्च

गडहिंग्लज - येथील देवदासी निराधार मुक्ती केंद्राच्या पुढाकाराने 5 ऑक्‍टोबर रोजी विविध मागण्यांसाठी देवदासी, वाघ्या-मुरळी, जोगते, शोषित,...

सौंदलग्याजवळील अपघातात बसर्गेतील जवान ठार

निपाणी - पुढे जाणाऱ्या वाहनाला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील जवान ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 20) रात्री उशिरा घडली. पुणे-बंगळूर...

नकली पिस्तुलाचा धाक दाखवून भडगावात दरोडा

गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी तीनच्या सुमारास बाळासाहेब कोडोली यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चौघा दरोडेखोरांनी नकली...

शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा

जत - शेतात सोलर सिस्टीम बसवून सरकारी अनुदान मिळवून देतो म्हणून आप्पासाहेब गळवे (रा. कोसारी, ता. जत) या शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी...

कळवीकट्टेतील हिंदूंचे ‘पीरदेव’ मंदिर

गडहिंग्लज - कळवीकट्टे (ता. गडहिंग्लज) या गावात एकही मुस्लिम नाही. तरीही गावचे ग्रामदैवत ‘पीर’ आहे. पिराच्या ठिकाणाला येथे ‘पिराचं देऊळ’ म्हणतात...