Sections

मेंदू, मन एकाच नाण्याच्या दोन बाजू - संतोष प्रभू

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 19 मार्च 2018

कोल्हापूर - ‘मेंदू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेंदू हा भौतिक आधार असून मन हा त्यातील एक भाग आहे. मन आणि मेंदूचा चिकित्सकपणे शोध घेण्यासाठी ‘मन वास्तव की आभास?’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत न्यूरोसर्जन संतोष प्रभू यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर - ‘मेंदू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेंदू हा भौतिक आधार असून मन हा त्यातील एक भाग आहे. मन आणि मेंदूचा चिकित्सकपणे शोध घेण्यासाठी ‘मन वास्तव की आभास?’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत न्यूरोसर्जन संतोष प्रभू यांनी व्यक्त केले. लेखक व पत्रकार डॉ. सुभाष देसाईलिखित ‘मन वास्तव की आभास?’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. 

शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा होते. खगोलशास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले, ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विशेष कार्याबद्दल गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना सन्मानित करण्यात आले.

मेंदू ब्रह्मांडातील क्‍लिष्ट वस्तू असून आकाशगंगेत जेवढ्या तारका आहेत, तेवढ्या पेशी मानवी मेंदूत वास्तव्य करतात. मनामुळेच माणूस आणि प्राणी यांत भेद करणे शक्‍य होते. मन आणि मेंदू हा एकच आहे की स्वतंत्र आहेत? असे अनेक मतप्रवाह असून त्याचा अभ्यास करणे या पुस्तकामुळे सहज शक्‍य होईल, असेही डॉ. प्रभू म्हणाले.

डॉ. देसाई म्हणाले, ‘‘या पुस्तकाच्या मागे गौतम बुद्ध आणि भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची प्रेरणा आहे. बुद्धांच्या संदेशातून मनाचा शोध घेण्याची ऊर्मी मिळाली.’’ डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. पंडित तोंदले यांनी प्रास्ताविक केले. विश्वास पवार यांनी आभार मानले.

Web Title: Kolhapur News Santosh Prabhu Comment

टॅग्स

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...

File photo
भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार

भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...

एक लाख कोटींचा खड्डा 

नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...

File photo
संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण'

संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले "गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...

आलोक नाथ यांची "सिन्टा'तून उचलबांगडी 

मुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...

वृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक 

नवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...