Sections

गडहिंग्लजला आढळला दुर्मिळ चित्रांग नायकूळ 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 2 मार्च 2018
गडहिंग्लज - नरेंद्र भद्रापूर यांच्या घराशेजारी सापडलेला चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप. 

गडहिंग्लज - येथील बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर यांच्या घराशेजारी बांधकामाच्या ठिकाणी चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप आढळला. सर्पमित्रांनी त्याला पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अधिवासात सोडून दिले. 

गडहिंग्लज - येथील बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर यांच्या घराशेजारी बांधकामाच्या ठिकाणी चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप आढळला. सर्पमित्रांनी त्याला पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अधिवासात सोडून दिले. 

श्री. भद्रापूर यांच्या घराशेजारी बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी भद्रापूर यांना साप दिसाला. त्यानंतर त्यांनी सर्पमित्र मेहबुब सनदी, नदीम नदाफ, विनायक चव्हाण यांना बोलावून घेतले. सर्पमित्रांनी सापाला पकडले. त्याचे निरीक्षण केल्यानंतर हा चित्रांग नायकूळ साप असल्याचे लक्षात आले. वनरक्षक कृष्णा डेळेकर, नागेश खोराटे यांच्या सहकार्याने या सापाला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आले.

चित्रांग नायकूळ हा साप सर्वसाधारणत: एक ते तीन फुटापर्यंत वाढू शकतो. तपकीरी आणि राखाडी रंगाच्या शरीरावर काळी किनार असलेले पिवळे खवले असतात. खवले डोक्‍याकडे गडद व शेपटीकडे अस्पष्ट असतात. दिवसा बाहेर पडणारा हा साप अत्यंत चपळ असतो. 

Web Title: Kolhapur News rare snake species found in Gadhinglaj

टॅग्स

संबंधित बातम्या

samir abhyankar
गाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)

शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी...

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

BHIDE-PUL.jpg
बाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार?

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...

kalsubai
सर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान!

सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...

dhing tang
वनमंत्री वाचवा! (ढिंग टांग)

मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...

narendra modi
चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी

अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...