Sections

कठोर मनाचा ‘माणूस’ रणजित गोहिरे

संदीप खांडेकर |   शुक्रवार, 11 मे 2018

कोल्हापूर - मृतदेह अपघातातला असो किंवा विष प्यायलेल्या व्यक्तीचा. तो आल्याची वर्दी मिळताच रणजित तुकाराम गोहिरे  शवविच्छेदन विभागाकडे धाव घेतात. हातात ग्लोव्हज व अंगावर ॲप्रन चढवून ब्लेडने मृतदेहाच्या विच्छेदनाचे काम सुरू करतात. या विभागाकडे पाऊल उचललं तरी सर्वसामान्यांच्या काळजात धस्स होतं.

कोल्हापूर - मृतदेह अपघातातला असो किंवा विष प्यायलेल्या व्यक्तीचा. तो आल्याची वर्दी मिळताच रणजित तुकाराम गोहिरे  शवविच्छेदन विभागाकडे धाव घेतात. हातात ग्लोव्हज व अंगावर ॲप्रन चढवून ब्लेडने मृतदेहाच्या विच्छेदनाचे काम सुरू करतात. या विभागाकडे पाऊल उचललं तरी सर्वसामान्यांच्या काळजात धस्स होतं. गोहिरे यांचं मात्र या विभागाशी जोडलेले ‘सेवेचं कनेक्‍शन’ कठोर मनाच्या माणसाचं ढळढळीत उदाहरण आहे. बावीस वर्षांत हजारो मृतदेहांचे विच्छेदन केल्याचे ते सांगतात.

सासऱ्यांच्या पावलावर पाऊल... गोहिरे हे संभाजीनगरमधील शाहू हाउसिंग सोसायटीत राहतात. एस. एम. लोहिया हायस्कूलमधून त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी ते सीपीआरमध्ये वार्ड बॉय म्हणून नोकरीस लागले. त्यांचे सासरे कराडमध्ये शवविच्छेदन विभागात नोकरीस होते. गोहिरे कराडला गेल्यानंतर शवविच्छेदन विभागात गेले होते. संतप्त सासऱ्यांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. 

कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांच्या डोक्‍यात आपणही शवविच्छेदन करायला शिकले पाहिजे, असा विचार डोक्‍यात घोळू लागला. सीपीआरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी त्याबाबत सांगितले. तसेच एक आठवड्याचे प्रशिक्षणही घेतले. सीपीआरमध्ये १९९८-९९ पासून त्यांनी हजारो मृतदेहांचे विच्छेदन केले आहे. त्यांचा मुलगा शुभम हाही त्यांच्याच वाटेवर चालत आहे.

एका दिवसात १७ मृतदेहांचे विच्छेदन आईचे निधन असो, की भावाचा मृत्यू मनच इतकं कठोर झाले आहे, की डोळ्यातून अश्रूही येत नाहीत, असेच ते सांगतात. यंदा २७ जानेवारीला १६ मृतदेहांचे विच्छेदन त्यांनी केले. विभागाच्या परिसरात मृतांचे नातेवाईक रडत होते. आपण मात्र स्तब्धच होतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कधी कुणाचा मृतदेह शवविच्छेदन विभागात येईल, याची वेळ सांगता येत नाही. पत्नीचे ऑपरेशन असताना अशीच वेळ आली होती. त्या वेळी तिच्याकडे जायलाही मिळाले नाही. डॉक्‍टरांनीच तिचे ऑपरेशन करून मला धीर दिला. - रणजित गोहिरे 

Web Title: Kolhapur News Ranjeet Gohire special story

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

SATARA-RASTRA.jpg
झाडावर अडकवलेली  केबल धोकादायक

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...

नाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी 

अंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...

kalsubai
सर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान!

सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...

जुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी

जुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...

eco-cycle.jpg
जुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप 

पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...