Sections

चला पंचगंगेत जाऊन पाणी पिऊ या - "स्वाभीमानी'चे प्रांताधिकाऱ्यांना आव्हान

राजेंद्र होळकर |   गुरुवार, 19 एप्रिल 2018
इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालयात पंचगंगा प्रदुषणाविषयी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली बैठक. (छायाचित्र - पद्माकर कुरपे) 

इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदुषण होत नसेल तर बैठकीतून उठून थेट पंचगंगेत जाऊ या. आम्ही सर्व जण नदीतील थेट पाणी पितो. तुम्ही ही ते पाणी प्यायले पाहिजे, असे थेट आव्हान आज येथे प्रांतकार्यालयात आयोजित बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदुषण होत नसेल तर बैठकीतून उठून थेट पंचगंगेत जाऊ या. आम्ही सर्व जण नदीतील थेट पाणी पितो. तुम्ही ही ते पाणी प्यायले पाहिजे, असे थेट आव्हान आज येथे प्रांतकार्यालयात आयोजित बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. तसेच चुकीचा अहवाल देऊन हातकणंगले-शिरोळ या दोन तालुक्‍यातील सुमारे साडे चार लाख लोकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.

"पाकीट संस्कृती'मुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नदी प्रदुषण करणाऱ्या घटकावर कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ही यावेळी झाला. 

शिरोली पुलाची, हातकणंगले औद्योगिक वसाहतीबरोबर हातकणगंले-कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत आणि इचलकरंजी शहरातील कारखान्याचे रासायनिक पाण्याबरोबर मैलामिश्रीत सांडपाणी ओढ्याद्वारे थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. यांची दखल घेऊन नदीत थेट मिसळत असलेल्या रासायनिक पाण्याबरोबर मैलामिश्रीत सांडपाणी थांबविण्यासाठी काय उपाययोजना करता येथील याकरीता प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांतकार्यालयामध्ये आज बैठक झाली.

या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी आर. एस. कदम व येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना चांगलेच धारे धरले. 

बैठकीला इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, हातकणंगले तालुक्‍याच्या तहसिलदार वैशाली राजमाने, शिरोळचे तहसिलदार गजानन गुरव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी आर. एस. कदम, येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, हातकणगंले तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शिरोळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभुशेटे, विजय भोसले, बंडू पाटील, वैभव कांबळे, नितीन माने, सागर चौगुले, अनिल पाटील, ऍड. सुरेश पाटील, राजाराम देसाई, विश्‍वास बालीघाटे, दादू चौगुले यांच्यासह शिरोळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह अनेक सरकारी उपस्थित होते. 

इचलकरंजी शहरातील कारखान्याचे रासायनिक पाण्याबरोबर मैलामिश्रीत सांडपाणी मोठ्या प्रमाणात काळ्या, चंदूर आणि कट्टीमोह या ओढ्याद्वारे थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याबाबतचा प्रश्‍न उपस्थितीत करण्यात आला. त्यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. रसाळ यांनी काळ्या ओढ्यातील पाणी शेजारच्या शेतकऱ्यांना पालिकेच्या वतीने पुरविले जात आहे. पण या शेतकऱ्यांच्या पंपाना शेतीऐवजी औद्योगिक पध्दतीने वीज पुरवठा केला. तर चौवीस तास ओढ्यातून पाणी उपसा होईल.

या ओढ्यातून नदीत जाणारे पाणी थांबेल. त्याचबरोबर नगरपालिका आणि सीईपीटी यांच्या संयुक्तपणे येत्या आठवड्याभरात नवीन ट्रान्सफार्म बसवून ओढ्यातील सांडपाणी घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी नवीन वीज वाहिणी टाकणार आहे. तर कट्टीमोह ओढ्यावर बंधार घालून पाणी अडविले जाईल. चंदूर ओढ्यातून नदी मिसळणारे पाणी ओढ्याशेजारच्या शेतकऱ्यांना दोन पाळीमध्ये वीज पुरवठा सुरु करुन हे पाणी थांबविले जाईल, असे सांगितले. 

शेतकरी संघटनेकडून ठिय्या आंदोलन  पंचगंगा नदी प्रदुषित करणाऱ्या घटकाच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने फौजदारी स्वरुपाच्या कारवाई करावी. त्याचबरोबर पंचगंगा नदीचे दिवसेंदिवस होणारे प्रदूषण थांबवावे, अन्यथा या मागणीसाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रांतकार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 

तर "त्या' कारखान्यावर कारवाई  शिरोली पुलाची, हातकणंगले औद्योगिक वसाहतीबरोबर हातकणगंले-कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील ज्या कारखान्यामधून रासायनिक पाणी प्रक्रिया न करता पंचगंगेत थेट सोडले जाते. त्या संबंधित कारखान्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी श्री. शिंगटे यांनी बैठकीतच आदेश दिले. 

"साहेब धडाकेबाज काम करा'  पंचगंगा नदी रासायनिक पाण्याबरोबर मैलामिश्रीत सांडपाण्यामुळे प्रदुषित होत आहे. नदी प्रदुषित करणाऱ्या घटकांवर प्रांताधिकारी श्री. शिंगटे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांसारखे धडाकेबाज काम करुन कडक कारवाई करा. हातकणंगले-शिरोळ या दोन तालुक्‍यातील लाखो जनता तुम्हाला डोक्‍यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभुशेटे यांनी थेट बैठकीत मांडले. 

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue

टॅग्स

संबंधित बातम्या

दुष्काळाचा कृती कार्यक्रम हाती घ्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्‍चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला...

औरंगाबादची हवा हानिकारक

औरंगाबाद- शहरात वावरत असताना आपण घेत असलेला श्वास हा रोगांचे ओझे लादणारा ठरतो आहे. शहराच्या हवेत रोगांचा राबता असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद...

shriram pawar
पुन्हा तालिबान... (श्रीराम पवार)

रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि...

ऊसतोडणीकडे पाठ; एमआयडीसीची वाट

औरंगाबाद-  ऊसलागवड ते गाळपापर्यंतच्या प्रक्रियेत ऊसतोडणी अतिशय कष्टाची असते. ऊन, वारा, थंडी यांची कसलीही तमा न बाळगता मिळेल त्या ठिकाणी माळांवर...

काँग्रेसचा सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48...

sundeep waslekar
हवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)

विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...