Sections

विश्‍वकोशातून उलगडणार मराठी भाषेचे नवे रूप

संदीप खांडेकर |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - मराठी भाषेतील आधुनिक साहित्याच्या अद्ययावतीकरणातून मराठी भाषेचे नवे रूप विश्‍वकोशातून उलगडले जाणार आहे. शिवाजी विद्यापीठ व विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्या सामंजस्य करारांतर्गत त्याचा अभ्यास सुरू असून, त्यासंदर्भातील नोंदी घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

कोल्हापूर - मराठी भाषेतील आधुनिक साहित्याच्या अद्ययावतीकरणातून मराठी भाषेचे नवे रूप विश्‍वकोशातून उलगडले जाणार आहे. शिवाजी विद्यापीठ व विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्या सामंजस्य करारांतर्गत त्याचा अभ्यास सुरू असून, त्यासंदर्भातील नोंदी घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या नोंदींवर विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्या संपादकीय मंडळाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या वाचकांसाठी ऑनलाइन उपलब्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

विश्‍वकोश निर्मिती मंडळाने वीस खंड प्रकाशित केले आहेत. मंडळाने हे खंड अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. विश्‍वकोशात अंतर्भूत नोंदींत नवी भर घालण्यासाठी विषयनिहाय शैक्षणिक संस्थांना जबाबदारी दिली. यासाठी अठ्ठावीस ज्ञान मंडळे स्थापन केली आहेत. डेक्‍कन वॉरियरकडे पुरातत्त्व, मुंबई विद्यापीठाकडे विज्ञान, प्रभात चित्र मंडळाकडे चित्रपट, तर शिवाजी विद्यापीठाकडे मराठी, राज्यशास्त्र, इतिहास विषयांतील नोंदी घेण्याचे काम सोपविले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस हे मराठी, डॉ. अवनीश पाटील इतिहास, तर डॉ. प्रकाश पवार हे राज्यशास्त्र विषयाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. 

मराठी भाषेसाठी आवश्‍यक नोंदींची यादी विद्यापीठाकडे सुपूर्द केली. आधुनिक साहित्यातील लेखक, त्यांच्या कथा, कादंबऱ्या, कविता, समीक्षक, मराठी भाषेतील कवी, त्यांचे साहित्य असा या माहितीचा परीघ आहे. या विषयातील तज्ज्ञांकडून ही माहिती संकलित केली जात आहे. डॉ. गवस यांच्यासह अन्य तज्ज्ञांकडून ती तपासून घेतली जात आहे. ही माहिती विश्‍वकोश मंडळाच्या संपादकीय मंडळाकडून पुन्हा तपासून झाल्यानंतर वाचकांसाठी ऑनलाइन उपलब्ध होईल.

विश्‍वकोश हा विश्‍वासार्हतेचा गाभा आहे. त्यातील माहिती अचूक असणे आवश्‍यक असते. ही माहिती संकलित करताना शैक्षणिक संस्थांना जबाबदारीने काम करावे लागते. ही जबाबदारी शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य कराराद्वारे स्वीकारली आहे. विद्यापीठाचे विश्‍वकोशाच्या निर्मितीसाठीचे काम मोलाचे ठरेल, यात शंका नाही. - सरोजकुमार मिठारी,  सहायक संपादक, विश्‍वकोश निर्मिती मंडळ.

Web Title: Kolhapur News Marathi Rajbhasha Din special

टॅग्स

संबंधित बातम्या

चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी

गोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना...

Baramatis total development is the main objective for NCP says Ajit Pawar
बारामतीचा सर्वांगिण विकास हेच उद्दिष्ठ : अजित पवार

बारामती शहर - समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत बारामतीचा सर्वांगिण विकास साध्य करण्याचे उद्दीष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नजरेसमोर ठेवले असून या...

दोन हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात

बांबवडे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळशी सज्जात कार्यरत असणारा तलाठी निवास साठे यास दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ...

राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी - राऊत

मालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा...

मोपापेक्षा चिपी विमानतळाला चांगला प्रतिसाद लाभेल - राऊत

मालवण - चिपी विमानतळाचा परिसर हा आल्हाददायक असल्याने मोपापेक्षा याच विमानतळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी...