Sections

मराठा समाजाने शिष्यवृत्ती फंड उभारावा

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - मराठा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मराठा समाजाने शिष्यवृत्ती फंड उभारावा. राजर्षी शाहू विकास कला व रिसर्च सेंटर (सारथी) या संस्थेचे उपमुख्य कार्यालय कोल्हापुरात व्हावे, असे दहा ठराव आज झालेल्या मराठा प्रतिनिधी परिषदेत मंजूर झाले.

कोल्हापूर - मराठा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मराठा समाजाने शिष्यवृत्ती फंड उभारावा. राजर्षी शाहू विकास कला व रिसर्च सेंटर (सारथी) या संस्थेचे उपमुख्य कार्यालय कोल्हापुरात व्हावे, असे दहा ठराव आज झालेल्या मराठा प्रतिनिधी परिषदेत मंजूर झाले.

राजर्षी शाहू स्मारक भवनात मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे परिषद झाली. महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते ठराव मंजूर झाले. शिरीष जाधव यांनी ठरावाचे वाचन केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले.

मंजूर झालेले अन्य ठराव असे...

  •     (कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार कर्ज योजनेत सुलभता आणावी. 
  •     कु-कुणबी याप्रमाणे कुळवाडी, कुरवाडी, कु. वा. आदी नोंदी असणाऱ्यांनाही कुणबी दाखले मिळण्यासाठी शासनाने नवीन सुधारित आदेश पारित करावेत.
  •     समाजातील सुशिक्षित मान्यवर व्यक्तींनी मराठा कुटुंबांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी.
  •     समाजाने सामुदायिक विवाह सोहळ्यांचा पुरस्कार करावा.
  •     समाजातील निवृत्त कर्मचारी-अधिकारी, अभियंते, संशोधक, उद्योजकांनी अनुभवाचा फायदा समाजातील गरजूंना द्यावा.
  •     समाजातील श्रीमंतांनी विविध उद्योग-व्यवसायांत गुंतवणूक करून रोजगारनिर्मिती करावी.
  •     सोशल मीडियाचा वापर सकारात्मक कामासाठी करावा.
  •     समाजाने कालानुरूप बदल स्वीकारून अग्रेसर राहावे.
Web Title: Kolhapur News Maratha Pratinidhi parishad

टॅग्स

संबंधित बातम्या

असा झाला दीप-वीर लग्नसोहळा !

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...

pune-herritage-walk.jpg
"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद

पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...

स्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या

शेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...

पोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन

मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...

शाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...

जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल

अकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...