Sections

चैत्र यात्रेत जोतीबा डोंगरावर खोबरे-वाटी उधळण्यावर तसेच प्लास्टीक पिशव्यावर बंदी

निवास मोटे |   शनिवार, 17 मार्च 2018

जोतिबा डोंगर - लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर तथा वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेत भाविकांना खोबरे-वाटी उधळण्यासह प्लास्टीकच्या पिशव्या वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दुकानात अग्निशमन यंत्र ठेवण्यासही सक्ती केली आहे.

जोतिबा डोंगर - लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर तथा वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेत भाविकांना खोबरे-वाटी उधळण्यासह प्लास्टीकच्या पिशव्या वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दुकानात अग्निशमन यंत्र ठेवण्यासही सक्ती केली आहे.

पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जोतिबा डोंगर येथे गेल्या दोन वर्षांपासून चैत्र यात्रेत खोबरेवाटी उधळण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. या वाट्या फेकल्यामुळे भाविक जखमी होतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षात खोबरेवाटी उधळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

- रामचंद्र चोबे पन्हाळा, तहसीलदार

खोबरेवाटी फेकल्यामुळे अनेक भाविक जखमी होऊ लागल्याने दोन वर्षापासून ही बंदी प्रशासनाने घातली आहे. यंदा ही ती कायम ठेवली आहे. व्यापारी दुकानदार यांच्याकडे खोबरेवाटी विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. डोंगरावर प्लास्टीकच्या पिशव्यावरही शासकीय यंत्रणेने बंदी घातली आहे. सर्व दुकानात कागदी व कापडी पिशव्या ठेवून यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टीकच्या पिशव्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. पाय घसरून पडण्याच्या घटना घडतात.  डोंगरावर यंदा प्रत्येक दुकानात अग्निशमन यंत्र ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. चैत्र यात्रेत कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक दुकानदार व्यापारी वर्ग यांना सुचना देण्यात आली आहे. अग्निशमन यंत्र  न ठेवल्यास त्याना  दंड  व शिक्षा सुनावली जाणार आहे

एकूणच चैत्र यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून डोंगरावर सर्वत्र घाई गडबड सुरू झाली आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी येत्या २३ तारखेला शासकीय यंत्रणेची विशेष बैठक होत आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस प्रमुख संजय मोहीते व शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने डोंगरावर मंदिराच्या शिखरावर रंगरंगोटी करण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

 

Web Title: Kolhapur News Jotiba Dongar Chaitra Yatra

टॅग्स

संबंधित बातम्या

लॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज 

नागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...

Ganesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार

सध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....

amazon-more
दिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)

भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...

महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर 

मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...

खंडाळ्यातील लिपिक लाच घेताना जाळ्यात 

खंडाळा - जमीनवरील "32 ग' ची नोंद रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक...