Sections

अंबाबाई मंदिरात आता सरकारी पुजारी 

संभाजी गंडमाळे |   बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार असून, तेथे सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राज्यपालांच्या सहीसाठी जाईल.

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार असून, तेथे सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राज्यपालांच्या सहीसाठी जाईल.

राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने याबाबत सर्वांचे अभिनंदन केले असून उद्या (ता. 29) आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. 

मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर सरकारी पुजारी नेमावेत, यासाठी जून महिन्यापासून येथे आंदोलन तीव्र झाले. हिवाळी अधिवेशनात याबाबत कोणताच निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष होते. काल विधिमंडळात श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदीर कोल्हापूर विधेयक मांडण्यात आले. त्याला आज विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर मंदिरात असलेल्या पुजाऱ्यांचे हक्क संपुष्टात येणार आहेत. राज्यस्तरीय परीक्षा घेवून मंदिरातील पुजाऱ्यांची नेमणूक होणार आहे. त्यात 50 टक्के महिलांनाही संधी दिली जाणार आहे.

शाहू वैदीक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मंदिरातील नेमणुकीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबत संघर्ष समितीचे आनंद माने म्हणाले, ""एकीकडे आंदोलन सुरू असताना निशिकांत मेथे यांच्यासह आम्ही न्यायालयात दावा दाखल केला होता. पंढरपूरप्रकरणी पंचवीस वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाने देवस्थान समितीला पुजारी नेमण्याचे अधिकार दिले असून याच आधारावर दावा दाखल केला. विधानपरिषदेत विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा लागू होईल.'' 

Web Title: Kolhapur News Goverment Pujari In Mahalaxmi Temple

टॅग्स

संबंधित बातम्या

रिकर्व्ही बेसविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार : राजू शेट्टी 

कऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के...

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...

Goa Minister Rane challenged Chotonkar
गोव्यात मंत्री राणेंचे चोडणकरांना आव्हान

पणजी- गोव्यात विकल्या जाणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिनचा अंश अद्यापही आढळत असल्याची टीका गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ही टीका...

विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये...

shatrughna Sinha Criticise On narendra Modi due to Rafeal deal
'प्रधानमंत्रीजी आतातरी खरे बोला'- शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली- राफेल करारावरून सर्वच जण आक्रमक झालेले असताना भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे...