Sections

कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय…

राजकुमार चाैगुले |   सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर - सोमवारी (दि. 5) पहाटे कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे 440 KV वीजउपकेंद्रातून मुडशिंगी 220 KV अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 220 KV वाहिनीची अर्थिंग तार तुटल्याने मुडशिंगी अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले.

कोल्हापूर - सोमवारी (दि. 5) पहाटे कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे 440 KV वीजउपकेंद्रातून मुडशिंगी 220 KV अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 220 KV वाहिनीची अर्थिंग तार तुटल्याने मुडशिंगी अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले.

परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात महावितरणचा वीजपुरवठा बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली होती. जवळपास चार तास वीजपुरवठा बंद राहिला. मात्र धुके कमी होताच यंत्रणा पूर्ववत होत असून बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.  उर्वरित ठिकाणी काम युध्दपातळीवर सुरू आहे. 

दाट धुके पडल्याने हवेतील आर्द्रता वाढते. आर्द्रतेत पाण्याचा अंश असल्याने वाहिनीतील दोन तारांमधील हवेमुळे विलग राहणारा विद्युत दाब एक होतो. त्यामुळे विजेचे वहन किंवा पारेषण पुढे होऊ शकत नाही. पर्यायाने वीजपुरवठा ठप्प होतो. अशाच प्रकारचा बिघाड आज पहाटेपासून विविध अतिउच्चदाब वीजउपकेंद्रांना येणाऱ्या वाहिन्यावर होत असल्याने अर्ध्या जिल्ह्यातील विद्युत पारेषण यंत्रणा ठप्प झाली होती. जसजसे धुके कमी होत आहे तसतशी पारेषण यंत्रणा पूर्ववत केली जात आहे. 

वीज उपकेंद्रांना धुक्याचा फटका

महापारेषणच्या मुडशिंगी, तिळवणी, बिद्री, फाईव्ह स्टार एमआयडीसी, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोथळी, राधानगरी, कुरूंदवाड या अतिउच्चदाब वीजउपकेंद्रांचा वीजपुरवठा पहाटेपासून ठप्प होता. सुमारे 295 मेगावॅट विजेचे पारेषण ठप्प झाले होते.

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू…

सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुडशिंगी उपकेंद्राला कराडहून आलेल्या वाहिनीवरून सुरळीत करण्यात आले. कोल्हापूर शहरातील शाहूमिल व विद्यापीठ उपकेंद्राला धुक्याचा फटका बसला होता. सकाळी 9.30 च्या सुमारास दोन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू झाल्याने कोल्हापूर शहरातील वितरण पूर्ववत झाले. बिद्री, कोथळी, राधानगरी, गोकुळ शिरगाव, जयसिंगपूर व कुरूंदवाड अतिउच्चदाब केंद्रातून होणारा वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला आहे. गडहिंग्लज विभागातील वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत फाईव्ह स्टार एमआयडीसी, हुपरी व इचलकरंजी येथील वीजपुरवठा बंद आहे. तो देखील थोड्याच वेळात पूर्ववत केला जात आहे.

सांगलीला जादा फटका नाही... सांगली जिल्ह्यात मिरज MIDC भागातील 33/11 KV वीज उपकेंद्राचा पुरवठा काहीअंशी पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला. तर 220 केव्ही मिरज ते विटा व कर्वे ते कडेगाव अतिउच्चदाब वीज वाहिन्यांवर बिघाड झाला असून पैकी कर्वे- कडेगाव वाहिनी कराडहून सुरू केली आहे. बाकी सांगली जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे.

Web Title: Kolhapur News fog affects on electricity supply

टॅग्स

संबंधित बातम्या

कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा

बारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....

"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले  

मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...

महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर 

मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...

योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार 

मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुढे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर...

dhing tang
बोबडे वकील! (ढिंग टांग)

बेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं! बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...